मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Pet Care Tips In Winter: हिवाळ्यात तुमच्या आवडत्या पाळीव प्राण्यांची अशी घ्या काळजी, फॉलो करा हे 5 उपाय

Pet Care Tips In Winter: हिवाळ्यात तुमच्या आवडत्या पाळीव प्राण्यांची अशी घ्या काळजी, फॉलो करा हे 5 उपाय

Pet Care Tips In Winter: माणसाचे प्राण्यांवर जेवढे प्रेम आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेम आणि निष्ठा प्राण्यांकडून मिळते. आपल्यासोबत राहताना प्राणी आपल्या कुटुंबाचा एक भाग बनतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं (Pet Care) ही आपली महत्त्वाची जबाबदारी बनते.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : प्राणी हे माणसांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. त्यांची आजूबाजूला असलेली उपस्थिती ही आपल्यासाठी आनंददायी अनुभूती आहे. आजकाल जगभरात पाळीव प्राणी पाळणे हा ट्रेंड बनला आहे. अनेक लोक आपल्या छंदासाठी आणि सुरक्षिततेसाठी अनेक प्रकारचे प्राणी पाळतात. ज्यामध्ये सर्वाधिक कुत्रे, मांजर आणि घोडे पाळले जातात. माणसाचे प्राण्यांवर जेवढे प्रेम आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेम आणि निष्ठा प्राण्यांकडून मिळते. आपल्यासोबत राहताना प्राणी आपल्या कुटुंबाचा एक भाग बनतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं (Pet Care) ही आपली महत्त्वाची जबाबदारी बनते. प्रत्येक ऋतूत त्यांची वेगळी काळजी घ्यावी लागते. सध्या थंडीचा हंगाम सुरू आहे, या ऋतूत आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी, याची माहिती (Pet Care Tips In Winter) घेऊयात.

आपल्या पाळीव प्राण्यांची अशी काळजी घ्या

1. व्यायाम करणं

व्यायाम करणे म्हणजे तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांना मॉर्निंग वॉकवर घेऊन जा, संध्याकाळी सुद्धा फिरा, त्यांच्यासोबत छोटे छोटे खेळ खेळून त्यांना सक्रिय ठेवा जेणेकरून त्यांच्या शरीरात ऊर्जा टिकून राहून ते निरोगी राहतील.

2. गरम पाण्यानं अंघोळ

गरम पाणी तुमच्यासाठी जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते पाळीव प्राण्यांसाठी गरजेचे आहे. मात्र, त्यांचे गरम पाणी जास्त गरम नसावे याची काळजी घ्या. कारण त्यांच्या शरीराची रचना मानवी शरीरापेक्षा वेगळी असते.

हे वाचा - Benefits of Onion for Women: तुम्हीही कांदा खात नाही का? वाचा महिलांसाठी काय आहेत त्याचे फायदे

3. उबदार कपडे

हिवाळ्यात थंडीमध्ये तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांना बाहेर फिरायला घेऊन जात असाल तर त्यांना उबदार कपडे घालावेत. घरातही हलके उबदार कपडे घाला.

4. उबदार ठिकाणी बेड

हिवाळ्यात दिवसापेक्षा रात्री थंडी जास्त असते. अशा परिस्थितीत, आपण आपल्या पाळीव प्राण्यांसाठी घरामध्ये अशा ठिकाणी जागा ठेवावी जिथे त्यांना उबदारपणा मिळेल. तसेच तिथे काही उबदार गोष्टीही असू द्या.

हे वाचा - Weight loss tips in budget : वजन कमी करण्याचा केलाय पक्का प्लॅन; मग या ‘लो बजेट’ गोष्टी येतील कामी

5. पाण्याची विशेष काळजी घ्या

हिवाळ्याच्या हंगामात, आपल्या पाळीव प्राण्यांसाठी पाण्याची विशेष व्यवस्था करा आणि त्यांना वेळोवेळी पाणी देत रहा. या ऋतूत थंड पाणी त्यांना प्यायला देऊ नका. त्यांना हलके गरम पाणी देणे फायदेशीर ठरेल. या सोप्या टिप्सचे पालन केल्याने तुमचे पोट चांगले आणि निरोगी वाटेल.

(सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips, Pet animal, Winter