जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 'लोक काय म्हणतील' याची भीती नाहीशी करण्यासाठी आत्मसात करा या पाच सवयी

'लोक काय म्हणतील' याची भीती नाहीशी करण्यासाठी आत्मसात करा या पाच सवयी

लोक काय म्हणतील याचा विचार मनात न येण्यासाठी उपाय

लोक काय म्हणतील याचा विचार मनात न येण्यासाठी उपाय

आपण जे करणार आहोत त्याबाबत लोक काय म्हणतील वा लोकांना काय वाटेल, असं वाटत राहणं. या विचारापायी अनेकदा आपल्या पूर्ण क्षमतेने आपण आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यात कमी पडतो. परिणामी…

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 05 मार्च : सहसा एखादी व्यक्ती एखादं स्वप्न पाहते, तेव्हा ते आपण पूर्ण करू शकतो का याचा अंदाज नक्कीच थोडाफार का होईना पण बांधत असते; पण अनेकदा पाहिलेली स्वप्नं पूर्ण होत नाहीत. यामागची कारणं एक वा अनेक असू शकतात. त्यातलं महत्त्वाचं कारण एक असतं, की आपण जे करणार आहोत त्याबाबत लोक काय म्हणतील वा लोकांना काय वाटेल, असं वाटत राहणं. या विचारापायी अनेकदा आपल्या पूर्ण क्षमतेने आपण आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यात कमी पडतो. परिणामी आपलं स्वप्न अपूर्णच राहतं. लोक काय म्हणतील असा विचार करत असलात, तर उपयुक्त ठरतील अशा पाच सवयींबद्दल जाणून घेऊ या. या सवयींच्या मदतीने तुम्ही भीती नक्कीच नाहीशी करू शकाल. आपल्याला माहितीच आहे, की कोणतीही सवय एका दिवसात लागत नाही; पण त्या गोष्टीचा नियमित सराव केल्याने ती काही कालावधीनंतर तुमची सवय होऊन जाते. अशाच पाच गोष्टी जाणून घेऊ या. त्या तुम्ही नियमित फॉलो केल्या तर लोक काय म्हणतील याचा विचार तुम्ही कधी करणार नाही. स्वतःला प्राथमिकता द्या अनेकदा आपण दुसऱ्यांची सुख-समृद्धी पाहून व लोक काय म्हणतील या विचारात आपली स्वप्नं सोडून देतो. त्याऐवजी आपण स्वतःला महत्त्व द्यायला पाहिजे. आपली प्राथमिकता ही स्वतःला व स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यालाच असली पाहिजे. स्वतःची किंमत करायला शिका आपली किंमत आपण स्वतः केली तरच इतर लोक आपल्याला किंमत देतील. जेव्हा आपण आपली किंमत ओळखतो तेव्हा लोक काय म्हणतील याचा आपण जास्त विचार करत नाही व त्याचा फरकही पडत नाही. तुम्ही जेव्हा स्वत:ची किंमत करता तेव्हा तुमच्यात आत्मविश्वास खूप वाढलेला असतो. हे वाचा -  हे 7 पदार्थ शरीरात होऊ देणार नाही पाण्याची कमतरता, आहारात नक्की करा सामील काम करताना आत्मविश्वासाने करा आपण एखादं काम करण्याच्या अगोदर ते काम केल्याने लोक काय म्हणतील याचा विचार करतो, तेव्हा तो विचार करण्यामागे आत्मविश्वास कमी असणं हे एक कारण असतं. त्यामुळे कोणतंही काम करताना आपल्यात आत्मविश्वास असणं खूप महत्त्वाचं असतं. आत्मविश्वास असेल तर मात्र लोक काय म्हणतील यास तुम्ही किंमत देणार नाही.

News18लोकमत
News18लोकमत

दुसऱ्यांना जज करणं सोडा अनेकदा आपण दुसऱ्यांना जज करत असतो. दुसऱ्याच्या कपड्यांवरून, त्यांच्या वागणुकीवरून, त्यांच्या कामावरून आपण त्यांची लायकी काढत असतो. तुम्ही असं करत असलात, तर ते त्वरित थांबवा. कारण जेव्हा आपण दुसऱ्यांची लायकी काढत असतो, तेव्हा दुसरे आपली लायकी काढतील याची भीती आपण मनात बाळगत असतो. त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. हे वाचा -  हे 6 घरगुती उपाय दातांची पोकळी करतील दूर! दात ठेवतील मजबूत आणि चमकदार आपल्यावर प्रेम करणाऱ्या व पाठिंबा देणाऱ्या माणसांमध्ये राहा आपल्या अवतीभोवती अशा काही व्यक्ती असतात, ज्या तुम्हाला सतत जज करत असतात. तुम्ही चांगलं करा वा वाईट, असे लोक त्यावर काही ना काही प्रतिक्रिया देतच असतात. त्यामुळे तुम्ही अशा माणसांमध्ये राहिलं पाहिजे, जे तुमच्यावर प्रेम करतात व नेहमी पाठिंबा देतात. अशा व्यक्ती तुम्ही बरोबर ठरलात तर तुमचं कौतुक करतील व कधी चुकलात तर तुम्हाला दुरुस्तही करतील. त्यामुळे चांगल्या माणसांच्या संगतीत राहा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात