नवी दिल्ली, 26 डिसेंबर : बरेच लोक शेंगदाण्याला ड्रायफ्रुट मानतात. परंतु, ते बीन्स किंवा मटारप्रमाणे एक शेंग आहे. मधुमेहाच्या समस्येनं त्रस्त असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आहारादरम्यान नेहमी लक्षात ठेवावं की, त्यांच्या शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाण (Peanuts and diabetics) कशामुळं वाढू शकतं. आरोग्यासाठी फायदेशीर पोषक डॉक्टरांच्या मते, शेंगदाण्याचं संतुलित प्रमाणात सेवन फायदेशीर मानलं जातं. कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि त्यात फायदेशीर पोषक घटक देखील आढळतात. पण, याचा अर्थ असा नाही की शेंगदाणे किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने मधुमेहाचा (diabetics) धोका नाही. शेंगदाण्यामध्ये निरोगी चरबी, प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, कार्ब्स, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जस्त, व्हिटॅमिन बी, नियासिन आणि फोलेट, व्हिटॅमिन ई असतात. मधुमेहाच्या समस्येवर शेंगदाण्याचे सेवन फायदेशीर ठरते मधुमेहाच्या रुग्णांना कमी ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic index) असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. ग्लायसेमिक इंडेक्स शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करते. त्यामुळे मधुमेहाच्या समस्येमध्ये शेंगदाण्याचे सेवन फायदेशीर मानले जाते. त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. याशिवाय शेंगदाण्यात असलेले मँगनीज इत्यादी पोषक घटक मधुमेहामध्ये फायदेशीर मानले जातात. या पद्धतीने खाणे फायदेशीर तुम्हाला टाईप 2 मधुमेह असेल तर शेंगदाणे ठराविक प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाणे फायदेशीर मानले जाते. भुईमूगाचे GI मूल्य 13 आहे आणि ते कमी GI मानले जाते. परंतु, शेंगदाणे जास्त प्रमाणात खाल्ल्याने देखील मधुमेहाच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. हे वाचा - Papaya Seed Benefits: पपईच्या बियादेखील आरोग्यासाठी आहेत खूप फायदेशीर; जाणून घ्या सर्व फायदे पीनट बटर मध्यम प्रमाणात खाणे हानिकारक नाही अनेक संशोधने आणि अभ्यास पुष्टी करतात की संतुलित प्रमाणात पीनट बटर मधुमेहासाठी हानिकारक नाही, परंतु तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की पीनट बटरचे सेवन करताना त्यात जास्त प्रमाणात तेल किंवा साखर मिसळू नये. याशिवाय पीनट बटरचे दररोज संतुलित प्रमाणात सेवन करणे मधुमेहामध्ये फायदेशीर ठरते. जर तुम्ही मधुमेही असाल आणि पीनट बटरचे दररोज जास्त सेवन केले तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. हे वाचा - Reduce Belly Fat: सुटलेलं पोट म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण; हे घरगुती उपाय करून रहाल फिट ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनच्या माहितीनुसार, सकाळी पीनट किंवा पीनट बटरचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील रक्तातील साखर दिवसभर नियंत्रणात राहते. याचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील इन्सुलिनची वाढही कमी होते. शेंगदाण्यामध्ये असलेले पुरेसे मॅग्नेशियम रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते, परंतु दररोज 100 ग्रॅमपेक्षा जास्त शेंगदाणे खाल्ल्याने मधुमेहाच्या रुग्णांमध्ये समस्या उद्भवू शकतात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







