मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Patchy Beard: तुमच्याही दाढीचे केस नीट वाढत नाहीत का? जाणून घ्या त्याची कारणे आणि उपाय

Patchy Beard: तुमच्याही दाढीचे केस नीट वाढत नाहीत का? जाणून घ्या त्याची कारणे आणि उपाय

Patchy Beard Problems : केसांच्या वाढीसाठी शरीरातील संप्रेरकांची पातळी योग्य असणं आवश्यक आहे. जर तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असेल तर त्याचा तुमच्या दाढीच्या वाढीवरही परिणाम होतो. ते ओळखण्याचा एक अतिशय अनोखा आणि सोपा मार्ग आहे.

Patchy Beard Problems : केसांच्या वाढीसाठी शरीरातील संप्रेरकांची पातळी योग्य असणं आवश्यक आहे. जर तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असेल तर त्याचा तुमच्या दाढीच्या वाढीवरही परिणाम होतो. ते ओळखण्याचा एक अतिशय अनोखा आणि सोपा मार्ग आहे.

Patchy Beard Problems : केसांच्या वाढीसाठी शरीरातील संप्रेरकांची पातळी योग्य असणं आवश्यक आहे. जर तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असेल तर त्याचा तुमच्या दाढीच्या वाढीवरही परिणाम होतो. ते ओळखण्याचा एक अतिशय अनोखा आणि सोपा मार्ग आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : आजकाल तरुणांमध्ये दाढी ठेवण्याचा ट्रेंड आहे. हॉलिवूडपासून ते बॉलीवूडपर्यंत पुरुष दाढीचे वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. पण काही जणांचीच दाढी चांगली आणि दाट असते. असे काही लोक आहेत ज्यांची दाढी फारशी चांगली दिसत नाही किंवा चेहऱ्यावर थोड्या-थोड्या भागांवर केस असल्यानं ती विरळ खराब दिसते. यापैकी अनेकजण ही समस्या सोडवण्यासाठी तज्ज्ञांची मदत (Patchy Beard Problems) देखील घेतात.

काही पुरुष ग्रूमिंग रूटीनचा (Grooming Routine) अवलंब करून दाढी (Beard Growth) वाढवतात. परंतु, काही लोकांची दाढी सर्व प्रयत्न करूनही फारशी वाढत नाही. बाजारात दाढी वाढवण्यासाठी अनेक प्रकारची प्रसाधनं किंवा सौंदर्य उत्पादनं उपलब्ध आहेत. त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असली तरी त्यांचा सर्वांवर चांगला परिणाम होतो असं नाही. दाढीचे केस वाढणं थांबवण्याची अनेक कारणे आहेत. आज आम्ही तुम्हाला दाढी वाढण्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत.

शरीरातील संप्रेरकांचं असंतुलन (Hormonal Imbalance)

केसांच्या वाढीसाठी शरीरातील संप्रेरकांची पातळी योग्य असणं आवश्यक आहे. जर तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असेल तर त्याचा तुमच्या दाढीच्या वाढीवरही परिणाम होतो. ते ओळखण्याचा एक अतिशय अनोखा आणि सोपा मार्ग आहे. काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जर तुमची अनामिका तुमच्या तर्जनीपेक्षा लांब असेल तर याचा अर्थ तुमच्या वाढत्या वयात टेस्टोस्टेरॉन चांगलं काम करत असेल. पण जर तसं नसेल, तर टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी तुम्ही अश्वगंधा, ऑयस्टर एक्स्ट्रॅक्ट, टोंगकट अली, झिंक सप्लिमेंट्स वापरू शकता. याचा तुमच्या दाढीच्या वाढीवर नक्कीच चांगला परिणाम होईल.

अनुवांशिक समस्या

जर तुमच्या वडिलांची किंवा आजोबांची दाढी कमी आणि थोड्या-थोड्या भागांवर असेल तर ही तुमच्यातील अनुवांशिक समस्या असू शकते. असं असल्यास आपल्या आहाराकडं अधिक लक्ष द्या आणि उच्च प्रथिनयुक्त आहार, झिंक सप्लिमेंट्स घ्या. तसंच, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तणावाचे प्रमुख कारण

तणावाचा आपल्या शरीरावर तसंच आपली त्वचा, केस आणि दाढीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, आपण आपल्या जीवनात तणावाची पातळी वाढणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी चांगल्या जीवनशैलीचा अवलंब करा. तसंच, आपल्या रोजच्या जेवणात पौष्टिक अन्न आणि व्यायामाचा समावेश करा.

हे वाचा - Health Tips : Vitamin B6 शरीराला यासाठी आहे गरजेचं; कॅन्सरपासून चार हात लांबच रहाल

वैद्यकीय इतिहास हे देखील कारण असू शकते

तुमचा वैद्यकीय इतिहास (medical history) देखील याचं कारण असू शकतं. तुम्‍हाला अ‍ॅलोपेशिया अरियाटा नावाचा आजार असल्‍यास, तुमच्‍या शरीरावरील केस गळण्‍याची शक्‍यता असते. ही स्थिती तुमच्या डोक्याच्या आणि शरीराच्या केसांनाच नाही तर, दाढीलाही नुकसान पोहोचवू शकते.

हे वाचा - Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का?

काय आहे उपाय

शक्यतोवर जीवनात ताणतणाव वाढू देऊ नका. तुमच्या जीवनशैलीत सकस आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यास पूरक आहाराचा समावेश करा. जर तुमची समस्या अनुवांशिक असेल तर डॉक्टरांची मदत घ्या.

(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Skin, Skin care