शाहरूख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांंच्या अभिनयानं सजलेला सिनेमा 'कुछ कुछ होता है' तुम्ही नक्कीच पाहिला असेल. त्यातील सगळ्याच व्यक्तिरेखांवर चाहत्यांनी खूप प्रेम केलं.
या सिनेमात एका लहान मुलाची व्यक्तिरेखा सगळ्यांना कमालीची आवडली. परजान दस्तूर हे त्याचं नाव. या सिनेमात त्याचा डायलॉग 'तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ' हा विशेष दाद मिळवून गेला.
ऑक्टोबरमध्ये त्यानं डेल्नासोबत एक समुद्राच्या बीचवर असतानाचा फोटो शेअर केला होता. यात तो गुडघ्यांंवर बसून डेल्नाला प्रपोज करतो आहे.