मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /'बॅड गर्ल, बॅड बॉय', शिस्त लावण्यासाठी म्हणून लहान मुलांना चुकूनही असं बोलू नका कारण...

'बॅड गर्ल, बॅड बॉय', शिस्त लावण्यासाठी म्हणून लहान मुलांना चुकूनही असं बोलू नका कारण...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

मुलांनी छोट्या छोट्या चुका केल्या की बऱ्याचदा पालक त्यांना चांगलं काय, वाईट काय हे समजवण्यासाठी त्यांना वाईट ठरवतात.

मुंबई, 22 एप्रिल : 3 वर्षांची परी इतर लहान मुलांसोबत खेळत होती. खेळता खेळता ती एका मुलावर थुंकली. आता परी इतकी लहान त्यामुळे आईने तिला मारलं नाही पण आई तिला परी असं करायचं नाही बेटा. तू बॅड गर्ल आहेस का? असं म्हणाली (Do not said bad words to child). त्यानंतर इतर मुलंही तिला बॅड गर्ल बॅड गर्ल (Bad boy, Bad girl word) म्हणून चिडवू लागले. बॅड गर्ल म्हणजे काय याचा नेमका अर्थ परीच्या वयाच्या मानाने तिला नक्कीच माहिती नाही. पण सर्वजण आपल्याला चिडवत आहेत, यामुळे बॅड गर्ल म्हणताच ती रडू लागते. आईही आपल्याला बॅड गर्ल म्हणते आहे. याचं तिला वाईट वाटतं (Parenting tips).

लहान मुलांना चांगलं काय, वाईट काय हे समजवण्याच्या नादात आपण त्यांना बॅड गर्ल किंवा बॅड बॉय म्हणतो. म्हणजे तू अमूक एखादी गोष्ट केलीस तर तू बॅड, तमूक गोष्ट केलीस तर तू गूड, अशी शिकवण त्यांना देतो. पण ज्या मुलांना आपण एरवी देवाघरची फुलं म्हणतो ती खरंच बॅड असतात का?, त्यांना असं बॅड म्हणणं योग्य आहे का?

हे वाचा - लेकीला चांगल्या मार्गावर नेण्याच्या नादात आईने उचललं खतरनाक पाऊल; नेटिझन्सही हादरले

पालकत्व तज्ज्ञ डॉ. इशिना सादना यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली आहे. त्या म्हणाल्या, "तुम्ही पालक म्हणून असं कसं करू शकता, तुम्ही बॅड पॅरेंट आहात, असं तुम्हाला कुणी म्हटलं तर तुम्हाला कसं वाटेल. फक्त एका चुकीमुळे तुम्ही वाईट पालक होतात का? नाही ना. मग विचार करा तुमच्या मुलांना बॅड म्हटलं तर कसं वाटत असेल. त्यामुळे मुलांना वाईट म्हणणं सोडा"

डॉ. सादना पुढे म्हणाल्या, "मुलं वाईट नसतात. ते ज्या काही गोष्टी करतात त्या वाईट असू शकतात, चुकीच्या असू शकतात. कारण त्यांचा मेंदू विकसनशील आहे, ती शिकत आहेत आणि तेसुद्धा एक माणूस आहेत, माणसांकडून चुका होतातच. त्यामुळे त्यांच्या एका चुकीसाठी त्यांनाच वाईट ठरवू नका"

हे वाचा - Liver Disease in Children : पालकांनो Alert राहा! लहान मुलांना विळख्यात घेतोय अज्ञात आजार; थेट यकृतावरच करतोय हल्ला

"आपण त्यांना बॅड म्हटलं तर त्यांचाही मेंदूही ते स्वीकारतो. आपण बॅडच आहोत असं त्यांना वाटतं. आपल्याला नक्कीच ते नको आहे. त्यामुळे ते किती चांगले आहेत हे त्यांना दाखवून द्या. ते तसेच होतील", असा सल्ला डॉ. सादना यांनी दिला आहे.

First published:
top videos

    Tags: Lifestyle, Parents and child, Relationship