मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुमचंही मूल जास्त चंचल आहे का? काळजी करू नका, त्याचा हा गुण भविष्यात ठरेल फायदेशीर

तुमचंही मूल जास्त चंचल आहे का? काळजी करू नका, त्याचा हा गुण भविष्यात ठरेल फायदेशीर

Fickleness in Children is Good : मुलांच्या या चंचल आणि खेळकर वागण्याबद्दल पालकांना नेहमीच काळजी वाटत राहते. त्यांच्या या बहिर्मुख वागणुकीमुळं (extrovert behavior) पालकांना अनेकदा संकोच वाटतो.

Fickleness in Children is Good : मुलांच्या या चंचल आणि खेळकर वागण्याबद्दल पालकांना नेहमीच काळजी वाटत राहते. त्यांच्या या बहिर्मुख वागणुकीमुळं (extrovert behavior) पालकांना अनेकदा संकोच वाटतो.

Fickleness in Children is Good : मुलांच्या या चंचल आणि खेळकर वागण्याबद्दल पालकांना नेहमीच काळजी वाटत राहते. त्यांच्या या बहिर्मुख वागणुकीमुळं (extrovert behavior) पालकांना अनेकदा संकोच वाटतो.

मुंबई, 30 डिसेंबर : काही लहान मुलं खूपच चंचल स्वभावाची असतात. काही केल्या ती एका जागी शांत राहत नाहीत. मुलांच्या या चंचल आणि खेळकर वागण्याबद्दल पालकांना नेहमीच काळजी वाटत राहते. त्यांच्या या बहिर्मुख वागणुकीमुळं (extrovert behavior) पालकांना अनेकदा संकोच वाटतो. आपल्या मुलाच्या वागण्यामुळं कोणत्याही प्रकारे कोणीही नाराज होऊ नये, असं पालकांना (Fickleness in Children is Good) वाटतं.

वास्तविक, अनेक मुलांमध्ये असं दिसून आलंय की, ती खूप खेळकर असतात. अशी मुलं सर्वांमध्ये मिसळतात. त्यांना मैत्री करायला वेळ लागत नाही. मुलांच्या या वागण्याला बहिर्मुखी म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर अशी मुलं आपलं म्हणणं इतरांपर्यंत सहजपणे पोहोचवतं आणि त्याचे सहज मित्र बनतात. जो अनोळखी लोकांशी सहज मैत्री करतो, त्याच्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करतो. अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ एमिली लोएब (Emily Loeb) सांगतात की, तुमचे मूल बहिर्मुखी असेल तर हे एक चांगलं लक्षण आहे. ते म्हणतात की, जेव्हा मुलाला स्वतःला सुरक्षित वाटतं आणि त्याला पुरेसं प्रेम मिळत असल्याची त्याची भावना असते, तेव्हा असं घडतं.

दैनिक भास्कर वृत्तपत्रानुसार, न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात एमिली यांनी लिहिलंय की, खेळकर वागणारी मुलं स्वत:ला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतात. यामुळं त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक चांगल्या प्रकारे विकसित होतो.

आज्ञाधारक मुलं घाबरतात

एमिली म्हणतात की, जी मुलं नेहमी आत्मसंतुष्ट, आदर देणारी, आज्ञाधारक (obedient) असतात, त्यांना खरं तर घरातील वडिलधाऱ्यांची भीती वाटते. अशा स्थितीत त्यांचा आत्मसन्मान (self respect) इतर मुलांच्या तुलनेत कमकुवत असतो.

हे वाचा - Hair Care Tips: हेअर मसाज करण्याची ‘ही’ आहे योग्य पद्धत, ऋजुता दिवेकर यांनी शेअर केलं सीक्रेट

संशोधन दर्शवतं की, घाबरलेली मुलं मुक्तपणे विकसित होऊ शकत नाहीत. पुढं अशी मुलं हिंसक होण्याची शक्यता खूप वाढते. त्यासाठी पुढील दोन टिप्स नेहमी लक्षात ठेवा, असं त्या सांगतात.

मुलांची भीती दूर करा

जी मुले आपल्या पालकांना घाबरतात त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. निर्णय घेण्यासाठी ते इतरांवर अवलंबून राहतात. स्वतःहून काही ठरवण्यापेक्षा किंवा करण्यापेक्षा त्यासाठी त्यांना इतरांच्या संमतीची आवश्यकता असते. स्वतः विचार करून त्याप्रमाणं कृती करू शकण्यात कमी पडल्यामुळं पुढं जाऊन हे चिंता, नैराश्याचं कारण बनतं.

हे वाचा - Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का?

कठोर व्हा, पण मुलांचेही ऐका

मुलांकडून मोठ्या अपेक्षा ठेवा. त्यांच्यासाठी कठोर नियम करा. पण त्यांच्या भावनांचा आदर करा. आवश्यक असल्यास नियम शिथिल करा. अशा प्रकारे त्यांना आपलेपणाची भावना वाटते. यामुळं ती अभ्यासात अधिक चांगली कामगिरी करतात.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle