मुंबई, 22 नोव्हेंबर : हिवाळ्यात संत्री (Orange) सहज उपलब्ध होतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे त्वचा निरोगी आणि सुंदर बनते. केसांसाठी संत्र्याची सालेही खूप फायदेशीर असतात. केसांच्या आरोग्यासाठी संत्र्याच्या सालीचा वापर केल्यास केसांच्या अनेक समस्या दूर होतात. हिवाळ्यात केसांच्या समस्या घालवण्यासाठी संत्र्याच्या सालीचे पाणी कसे वापरता येईल याबाबत जाणून घेऊयात. संत्र्याच्या सालीचे पाणी कसे वापरावे ते (Orange Peel Water For Hair Care) जाणून घ्या.
संत्र्याच्या सालीचे पाणी कसे बनवायचे
संत्र्याची साल रात्रभर पाण्यात ठेवा आणि सकाळी ते पाणी गाळून घ्या. याशिवाय साली पाण्यात उकळून थंड करून गाळून घेऊ शकता. या दोन पद्धतीनं संत्र्याच्या सालीचे पाणी तयार करता येईल.
संत्र्याच्या सालीचे पाणी कसे वापरावे
1.संत्र्याच्या सालीचे पाणी आणि ऑलिव्ह ऑईल
संत्र्याची साले रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी हे पाणी गाळून घ्या. तुम्ही त्यात 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल घाला आणि हे मिश्रण केसांना लावा. यानंतर केस गरम टॉवेलने बांधा. 15 मिनिटांनंतर केस धुवा.
2. संत्र्याची साल पाणी आणि दूध
संत्र्याची साल पाण्यात उकळा, गाळून घ्या आणि थंड होऊ द्या. आता या पाण्यात कच्चे दूध मिसळा आणि त्याने टाळूला मसाज करा. अर्ध्या तासानंतर केस धुवा. या पद्धतीनं केसांना प्रोटीन ट्रीटमेंट दिली जाऊ शकते.
हे वाचा - Weight loss tips in budget : वजन कमी करण्याचा केलाय पक्का प्लॅन; मग या ‘लो बजेट’ गोष्टी येतील कामी
3. संत्र्याच्या सालीचे पाणी आणि गुलाब जल
एका स्प्रे बाटलीत एक कप संत्र्याच्या सालीचे पाणी, अर्धा कप गुलाबजल आणि एक चमचा ग्लिसरीन एकत्र करून मिक्स करा. नंतर हे मिश्रण घरगुती हेअर स्प्रे म्हणून वापरा. हे मिश्रण केसांना लावा आणि रात्रभर राहू द्या. केसांमधील कोरडेपणाची समस्या कमी होईल आणि केसांमध्ये चमक दिसून येईल.
(सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beauty tips, Lifestyle, Orange, Woman hair