मुंबई, 17 ऑक्टोबर : सोशल मीडियामुळे क्षणात गोष्टी व्हायरल होतात. इंटरनेटमुळे जग जवळ आलंय. त्यामुळे एकाच वेळी अनेकजण व्हायरल गोष्टींवर प्रतिक्रिया देताना दिसतात. अशातच सध्या ऑप्टिकल इल्युजन अर्थात दृष्टिभ्रम निर्माण करणारी चित्र, कोडी प्रचंड चर्चेत आहेत. त्यामुळे ही ऑप्टिकल इल्युजनची कोडी ट्रेंडिंग आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असंच एक कोडं सध्या सगळीकडे दिसतंय. पण या वेळेस या कोड्यातून भूत शोधण्याचं काम आहे. नेटिझन्स तर शोधून अक्षरश: थकलेत. जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती. नेटिझन्ससाठी ठरंतय आव्हानत्मक सध्या एक ऑप्टिकल इल्युजनचा फोटो चांगलाच व्हायरल झालाय. अनेकांसाठी हे ऑप्टिकल इल्युजन म्हणजे कोडंच आहे. निष्णात नेटिझन्सही या फोटोतून भूत शोधू शकले नाहीत. पण जर तुम्ही या फोटोतून भूत शोधू शकलात, तर मात्र तुमच्या हुशारीची दादच द्यायला हवी. इतंकच नाही तर तुमची निरीक्षणशक्तीही कौतुकास्पदच ठरेल हे निश्चित. या फोटोत नक्की आहे तरी काय याबद्दल जाणून घेऊयात. फोटोत दडलंय एक भूत हा फोटोत तुम्हाला भरपूर स्केलेटन्स म्हणजे मनुष्याचे विविध सांगाडे दिसतील. प्रथमदर्शी हे चित्र चक्रावून टाकणारं वाटू शकतं. पण याच फोटोतून तुम्हाला भूत शोधायचं आहे. फोटो पाहताक्षणी तुम्हाला भूत नक्कीच दिसणार नाही, अशा पद्धतीनेच ते दडवलं गेलंय. पण जर तुम्ही शोधून दाखवलंत तर तुम्ही इंटिलिजंट ठराल. त्यामुळे डोळ्यात तेल घालून तुम्ही हा फोटो पाहणं आवश्यक आहे. वाचा - ऑफर्सच्या नादात तुम्ही ही चूक तर करता नाही ना? मनासारखी शॉपिंग करुनही करा बचत फक्त 17 सेकंदांत तुम्हाला उत्तर शोधायचंय व्हायरल फोटोतून भूत शोधून काढण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मोबाईलवर 17 सेकंदाचा टायमर लावणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही भूत शोधायचं काम सुरू करा. कारण इथे तुमच्या निरीक्षणशक्तीची परीक्षा आहे. एक क्लु आम्ही देतो, तो म्हणजे या फोटोकडे लक्षपूर्वक एकटक पाहिल्यास तुम्हाला नक्की उत्तर मिळेल. कदाचित तुमच्यातील काहीजणांनी शोधलं असेलही. पण फोटोत हे भूत उजव्या बाजूला आहे हा दुसरा क्लु. तरीही जर तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही खाली दिलेला फोटो पाहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल.
तुमच्या मेंदूला चालना देणारे विविध खेळ असतात. त्यापैकीच हे ऑप्टिकल इल्युजन आहे. यामुळे मनोरंजनासोबत नेटिझन्सच्या निरीक्षणशक्तीचीही परीक्षा घेतली जाते यात शंका नाही.