जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Optical Illusion: बुद्धीला चॅलेंज! जंगलात लपलंय एक हरीण; कसं शोधाल 20 सेकंदांत?

Optical Illusion: बुद्धीला चॅलेंज! जंगलात लपलंय एक हरीण; कसं शोधाल 20 सेकंदांत?

Optical Illusion: बुद्धीला चॅलेंज! जंगलात लपलंय एक हरीण; कसं शोधाल 20 सेकंदांत?

या जंगलात एक हरीण लपलंय. फोटोतल्या त्या हरणाला शोधून काढणं खूपच अवघड आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 08 नोव्हेंबर :  सध्याच्या जगात करमणूक आणि मनोरंजनासाठी विविध गोष्टी उपलब्ध आहेत. काही गेमिंग अ‍ॅप्सही अनेकांच्या मोबाइलवर असतात. ऑनलाइन गेम्सही भरपूर पाहायला मिळतात. विरंगुळ्याचं साधन म्हणून गेम्स हा पर्याय सगळीकडेच दिसून येतो. सोशल मीडियावरही नेहमीच मनोरंजक, ज्ञानवर्धक खेळ, गोष्टी, कोडी आपल्याला दिसतात. सध्या ऑप्टिकल इल्युजनचा जमाना आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अगदी रोजच्या रोज दृष्टिभ्रमाचे हे खेळ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतात. असाच एका जंगलातला फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या जंगलात एक हरीण लपलंय. फोटोतल्या त्या हरणाला शोधून काढणं खूपच अवघड आहे. अगदी निष्णात नेटिझन्सही या कामात मागे पडले आहेत. या ऑप्टिकल इल्युजनच्या नव्या कोड्याविषयी जाणून घेऊ या. काही जणच उत्तर शोधण्यात झाले यशस्वी हे कोडं सोडवण्यासाठी दिलेला वेळ अगदी अत्यल्प आहे. त्यामुळे फोटोतलं हरीण शोधण्यात फार थोड्यांनाच यश आलंय. हा फोटो इतका गुंतागुंतीचा आहे की हरीण सहजासहजी शोधणं कठीण आहे. असा हा बुद्धीचा कस लागणारा आणि तुमच्या संयमाची परीक्षा पाहणारा हा ऑप्टिकल इल्युजनचा फोटो खूपच लक्षवेधी ठरतोय. हेही वाचा - Marathi Jokes: बिनधास्त हसा! वाचा खळखळून हसायला लावणारे झक्कास जोक्स लपलेलं हरीण 20 सेकंदांत शोधा ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोत जंगलाचा फोटो दिसतोय. या जंगलात तुम्हाला झाड, वाळलेल्या काठ्या, वाळलेली पानं, माती असं सगळं एकाच रंगाशी साधर्म्य असलेलं दिसतंय. परंतु, या फोटोतून हरीण शोधण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाइलवर 20 सेकंदाचा टायमर लावायचं लक्षात ठेवा. एकटक या फोटोकडे बघत राहिल्यास तुम्हाला हरीण नक्कीच दिसू शकेल. नजरेची आणि संयमाची परीक्षा घेणारी ही दृष्टिभ्रमाची कोडी अनेकांना फसवणारी ठरतात. एखादा फोटो पाहिल्यावर ती प्रतिमा तुमच्या मेंदूत घट्ट बसते. त्यामुळे समोर असलेली गोष्टही कधीकधी दिसत नाही. यासाठी आम्ही तुम्हाला एक क्लू देतो. फोटोच्या डाव्या बाजूला लपलंय हरीण तुम्ही फोटोतून हरीण शोधत असाल, तरीदेखील तुम्हाला ते सापडत नसेल, तर आम्ही तुम्हाला एक क्लू देतो. फोटोच्या डाव्या बाजूस हरीण शोधायचा प्रयत्न करा. तुमच्यातले काही जण हरीण शोधण्यात यशस्वी झाले असतील. याचाच अर्थ त्यांची नजर तीक्ष्ण आहे. परंतु, अजूनही तुम्ही उत्तराच्या शोधात असाल, तर खाली दिलेल्या फोटोत जिथे लाल गोल केला आहे तो नीट निरखून पाहा. तुमचं उत्तर त्या लाल गोलाच्या आत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: deer , lifestyle
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात