युटेरस किंवा सर्व्हिक्समध्ये प्रीकॅन्सर किंवा कॅन्सरच्या पेशी असतील, तर त्यामुळे अनियमित रक्तस्राव होऊ शकतो.
युटेराइन पॉलिप्स (uterine polyps) किंवा फायब्रॉईड fibroids – uterus गर्भाशयात कॅन्सर नसलेला ट्युमरची वाढ होते आणि त्यामुळे रक्तस्राव होतो. यामुळे सातत्याने रक्तस्राव होतो, जो मासिक पाळीशी संबंधित नसतो.
एंडोमेट्रिऑसिस (Endometriosis) -एंड्रोमेट्रीअम हे गर्भाशयाच्या आत असलेले आवरण आहे, जे मासिक पाळीतील रक्तस्रावात गळूण पडते. हे आवरण जेव्हा गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागतं, तेव्हा त्याला एंडोमेट्रिऑसिस असं म्हणतात. यामुळे भरपूर प्रमाणात रक्तस्राव होतो.
इन्फेक्शन - व्हजायनल (Vaginal) किंवा सर्व्हिकल (cervical) इन्फेक्शन असल्यासदेखील मासिक पाळीशिवाय रक्तस्राव होऊ शकतो.
थायरॉईड समस्या - थायरॉईड ग्रंथीमध्ये समस्या असल्यास महिन्यातून दोनदा पीरियड्स येऊ शकतात. थायरॉईड ग्रंथी ही मेंदूतील त्याच ग्रंथीकडून नियंत्रित होतं, ज्याद्वारे मासिक पाळी आणि ओव्हॅल्युशन नियंत्रित केलं जातं.
रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज (Menopause) - रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळी पूर्णपणे जाण्याची वेळ जेव्हा येते, त्याआधी काही लक्षणं दिसतात. त्यावाळी तुम्हाला असा रक्तस्राव होऊ शकतो, शिवाय हॉट फ्लॅशेस, रात्री घाम येणं, व्हजायनामध्ये कोरडपणा, झोप न लागणं अशा समस्याही उद्भवतात.
गर्भनिरोधक गोळी घेणं विसरणं - तुम्ही जर गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल आणि एखाद दिवशी गोळी घेणं विसरलात, तर तुम्हाला अनियमित रक्तस्रवा होऊ शकतो. त्यानंतर सूचनेनुसार तुम्ही पुन्हा गर्भनिरोधक गोळ्या घेणं सुरू केलं की तुमचा रक्तस्राव कमी होतो.
प्रेग्नन्ट (Pregnant) - मासिक पाळी चुकली हे प्रेग्नन्ट असण्याचं पहिलं लक्षण आहे. मत्र काही महिलांना प्रेग्नन्सीमध्ये रक्तस्रावही होतो. गर्भाशयाबाहेर बीज फलित होतं, तेव्हादेखील असं होतं. मात्र हे खूप दुर्मिळ आहे.
प्रवास - तुम्ही दूरचा प्रवास करून आलात आणि ठरलेल्या तारखेआधीच तुमची मासिक पाळी आली, तर हे प्रवासामुळे झालेलं असू शकतं. प्रवासाचा परिणाम मासिक पाळीवर होतो.
सूचना – ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी देत नाही, तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.