देशातल्या 3 पैकी एका महिलेचं वजन सरासरीपेक्षा अधिक; लठ्ठ पुरुषांची संख्या मात्र कमी

NFHS-5 Report: आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, देशात लठ्ठ महिलांची संख्या वाढत आहे, तर पण पुरुष मात्र सडपातळ आहेत.

NFHS-5 Report: आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, देशात लठ्ठ महिलांची संख्या वाढत आहे, तर पण पुरुष मात्र सडपातळ आहेत.

  • Share this:
    मुंबई, 15 डिसेंबर  : सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांना आपल्या आरोग्याकडं लक्ष द्यायला फारसा वेळ मिळतं नाही. असं असताना सध्या कोरोना पार्श्वभूमीवर देशातील अनेकांना वर्क फ्रॉम होम करावं लागत आहे. त्यामुळं कार्यालयीन कामकाज करणाऱ्या अनेक लोकांचं घराबाहेर पडणंच बंद झालं आहे. शरीराला व्यायाम नसणं आणि घरात बसून बैठं काम करणं यामुळं अनेकांना लठ्ठपणाच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. लठ्ठपणाचा त्रास स्त्री आणि पुरुष अशा दोघांना होत आहे. पण भारतामध्ये लठ्ठपणाच्या नियंत्रणाच्या बाबतीत पुरूषांनी महिलांना मागे टाकलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, देशात लठ्ठ महिलांची संख्या वाढत आहे, तर अशा पुरुषांची संख्या कमी झाली आहे. पण महाराष्ट्रात ही स्थिती काहीशी उलट आहे. सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील 23.4% महिला लठ्ठ आहेत. अशा पुरुषांची संख्या 24.7 टक्के एवढी आहे. पण 2015-16 साली केलेल्या सर्वेक्षणांनुसार, राज्यात जास्त वजन असणाऱ्या महिलांची संख्या स्थिर राहिली आहे, तर पुरुषांची संख्या जवळपास 1 टक्क्यानी वाढली आहे. राज्यातील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात लठ्ठ लोकांची संख्या फारचं कमी आहे. शहरी भागात लठ्ठ महिलांची संख्या 29.6 टक्के आहे, तर ग्रामीण भागात याचे प्रमाण केवळ 18.3 टक्के एवढं आहे. त्याचबरोबर शहरांमधील 28.9 टक्के पुरुषांचं वजन सामान्यांपेक्षा अधिक आहे, तर खेड्यातील 21.3 टक्के पुरुषांचं वजन अधिक आहे. राज्यातील 44.5 टक्के महिला आणि 40.7 टक्के पुरूषांना लठ्ठपणाचा धोका अहवालानुसार, लठ्ठपणाच्या बाबतीत  44.5% स्त्रिया आणि 40.7% पुरुषांच्या कंबरेचा घेरा धोकादायक पातळीपर्यंत वाढला आहे. तर खेड्यांमध्ये याचे प्रमाण पुरूषांमध्ये 43.2 टक्के आणि महिलामध्ये 51.5 टक्के एवढे आहे. राज्यातील लठ्ठ महिलांच्या कंबरेचा घेरा 85 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे आणि पुरुषांची कंबर 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे. पण गेल्या पाच वर्षांत राज्यात कमी वजन असणाऱ्या महिलांची परिस्थिती काही प्रमाणात सुधारली दिसत आहे. याबाबतीत गेल्या पाच वर्षांत कमी वजन असणाऱ्या महिलांच्या संख्येत घट होऊन हा आकडा 23.5 टक्क्यांवरून 20.8 टक्क्यांवर आला आहे, तर पुरुषांच्या बाबतीत हा आकडा 19.1 टक्क्यांवरून घटून 16.2 टक्क्यांवर आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published: