Home /News /lifestyle /

Dating app वर मिळाला परफेक्ट मॅच पण...; सत्य समजताच हादरली तरुणी

Dating app वर मिळाला परफेक्ट मॅच पण...; सत्य समजताच हादरली तरुणी

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

डेटिंग अॅपवर (Dating app) प्रोफाइल मॅच होताच महिलेला आनंद होण्याऐवजी टेन्शन आलं.

    वॉशिंग्टन, 05 मार्च : आपल्याला परफेक्ट लाइफ पार्टनर मिळावा यासाठी बरेच लोक डेटिंग साइट्स किंवा डेटिंग अॅपची मदत घेतात. एका महिलेनेही अशाच डेटिंग अॅपवर (Dating app) आपलं प्रोफाइल बनवलं. एका व्यक्तीच्या प्रोफाइलसोबत तिचं प्रोफाइल मॅचही झालं. पण जेव्हा तिने त्या व्यक्तीबाबत अधिक माहिती तपासली तेव्हा जे सत्य समजलं त्यामुळे ती हादरली (Woman profile match on dating app). अमेरिकेत राहणाऱ्या या महिलेने डेटिंग अॅप आपल्यासाठी कसं डोकेदुखी ठरलं हे सांगितलं आहे. एका रिलेशनशिप फोरमला तिने सांहितलं की तिने डेटिंग अॅप डाऊनलोड केलं आणि आपलं अकाऊंट बनवलं.  डेटिंग अॅप डाऊनलोड करताच  एका तरुणाला राइट स्वाइप केलं आणि प्रोफाइल मॅच झालं. त्यासाठी तिने आपली एक ट्रिपही रद्द केली. त्याच्याबाबत अधिक माहिती मिळवली तेव्हा ती शॉक झाली कारण ज्या व्यक्तीसोबत तिचं प्रोफाइल मॅच झालं ती दुसरी तिसरी कुणी नाही तर चक्क तिचा दाजी म्हणजे तिच्या बहिणीचा नवरा आहे. तिच्या चुलत बहिणीच्या नवऱ्यासोबत तिचं प्रोफाइल मॅच झालं. जिला एक मुलगाही आहे. हे वाचा - 71 वर्षीय आजीचं 17 वर्षीय कोवळ्या मुलावर प्रेम; लेकाच्या मृत्यूनंतर लगेच लग्न तिने सांगितलं, 'आपण आणि आपली बहीण दोघंही वेगवेगळ्या देशात राहतो. त्यामुळे याआधी ती कधीच तिच्या चुलत बहिणीच्या नवऱ्याला भेटली नव्हती. आता आपल्या बहिणीसोबत काय होणार याची चिंता तिला लागली आहे.' तिला आपल्या बहिणीला याबाबत सांगायचं आहे. पण कसं तेच तिला समजत नाही आहे. 'मला माहिती आहे मी काही चुकीचं केलं नाही. पण मी सर्वकाही तिला सांगितलं आणि ती नाराज झाली तरी मला वाईट वाटणार नाही', असं ती म्हणाली. आता हे आपण आपल्या बहिणीला कसं सांगावं याचं टेन्शन तिला आलं आहे. सोशल मीडियावर तिने नेटिझन्सकडे सल्ला मागितला आहे. लकाही लोकांनी तिने तिच्या बहिणीला तिझा नवरा डेटिंग अॅप वापरत असल्याचं सांगायला हवं असं सांगितलं आहे. तर काहींनी असं केल्याने ती नात्यामुळे अडकेल. त्याऐवजी दुसऱ्या कुणा व्यक्तीकडून तिच्या बहिणीला याबाबत माहिती झालं चांगलं राहिल. हे वाचा - भावाला आपला नवरा बनवण्याचा हट्ट; म्हणे, 'काही झालं तरी याच्याशीच करणार लग्न' तिने या प्रोफाइलचा स्क्रिनशॉटही काढला आहे. पण काय बोलावं हे समजेना म्हणून तिने त्याच्याशी बोलणंही सुरू केलं नाही. काही जण म्हणाले तिने आपल्या बहिणीला तिच्या पतीसंबंधी काहीतरी सापडलं आहे, असं सांगून तिला ते स्क्रिनशॉट पाठवावे. एकाने सांगितलं की तू बहिणीच्या घरी तिला भेटायला जा. दोघीच असताना तिला हे सर्व दाखवणं योग्य राहिल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Dating app, Lifestyle, Online dating, Relationship

    पुढील बातम्या