मुंबई, 03 डिसेंबर : उन्हाळ्यात सर्वांनाच त्रस्त करणारा सूर्यप्रकाश हिवाळ्यात सर्वांना हवाहवासा वाटतो. हिवाळ्यात उन्ह अंगावर घेण्याची एक वेगळीच मजा असते. हिवाळ्यात सूर्यप्रकाशामुळे शरीराला उष्णता तर मिळतेच, शिवाय शरीराला ‘ड’ जीवनसत्त्वही मुबलक प्रमाणात मिळते. सूर्य नेहमीच व्हिटॅमिन डीचा पुरवठा सहजपणे पूर्ण करतो.
व्हिटॅमिन डी प्रत्येकाच्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. हिवाळ्याच्या हंगामात सूर्यप्रकाश अंगावर घेणे खरोखर फायदेशीर आहे. सूर्यप्रकाशाच्या विशेष फायद्यांबद्दल तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे त्याबाबत जाणून घेऊया.
व्हिटॅमिन डी घेण्याची योग्य वेळ
सकाळची वेळ-
जर तुम्हाला व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात हवे असेल तर सकाळी उगवत्या सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळवले पाहिजे. तुम्ही सकाळी 8 वाजण्यापूर्वी 25 ते 30 मिनिटे सूर्यप्रकाशात वेळ घालवा. यावेळी, तुम्हाला तुमच्या आरोग्यानुसार व्हिटॅमिन डी योग्य स्वरूपात मिळते.
संध्याकाळची वेळ-
संध्याकाळी देखील सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळते. तुम्हाला संध्याकाळी सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळवायचे असेल तर तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी उन्ह अंगावर घ्यावे. त्याचाही फायदा होतो.
सूर्यप्रकाशाचे फायदे
सूर्यप्रकाशात सर्वात जास्त व्हिटॅमिन डी असते. व्हिटॅमिन डी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्याचे काम करते. एवढेच नाही तर शरीराला ऊर्जावान बनवण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावते.
हे वाचा - Health Tips: तुम्हाला माहीत आहे का? या गोष्टी शिजवून खाणं आरोग्यासाठी असतं अपायकारक
सूर्यप्रकाशात UVA असते
सूर्यप्रकाशापासून शरीराला UVA मिळते, ज्यामुळे आपला रक्तप्रवाह सुधारतो. यासोबतच रक्तातील ग्लुकोजची पातळी आणि श्वासोच्छवासाची गती देखील सुधारते.
हे वाचा - Health Care Tips: तुम्हालाही वारंवार तहान लागते का? या आजारांचा धोका असू शकतो
मेंदू आणि झोप
सेरोटोनिन, मेलाटोनिन आणि डोपामाइन सूर्याच्या किरणांमध्ये आढळतात. याचा मानसिक आरोग्यासाठीही मोठा फायदा होतो. उदासीनता किंवा चिंताग्रस्त व्यक्तींनी सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी घेणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर सूर्यापासून मिळणारे व्हिटॅमिन डी खूप फायदेशीर आहे. मेलाटोनिन नावाचा हार्मोन सूर्यप्रकाशातून मिळतो, जो तुमच्या झोपेसाठी आवश्यक असतो.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Vitamin D