जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / रेल्वेमध्ये पुन्हा सुरू झाली भरती, १० वी पास या तारखेपर्यंत करू शकतात अर्ज

रेल्वेमध्ये पुन्हा सुरू झाली भरती, १० वी पास या तारखेपर्यंत करू शकतात अर्ज

रेल्वेमध्ये पुन्हा सुरू झाली भरती, १० वी पास या तारखेपर्यंत करू शकतात अर्ज

रेल्वे रिक्रूटमेंट बोडाने अॅप्रेंटिस अॅक्ट १९६१ नुसार अॅप्रेंटिस ट्रेनिंग पोस्टसाठी अर्ज मागावले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, २८ नोव्हेंबर २०१८- रेल्वे रिक्रूटमेंट बोडाने अॅप्रेंटिस अॅक्ट १९६१ नुसार अॅपेंटिस ट्रेनिंग पोस्टसाठी अर्ज मागावले आहेत. या भरती भारतीय रेल्वेच्या झांसी डिविजनच्या ४४६ जागांसाठी होत आहे. ४४६ पदांपैकी १२० पदं ओबीसी उमेदवारांसाठी, ६९ एससी उमेदवारांसाठी तर ३४ पदं एसटी उमेदवारांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. या अॅप्रेंटिसशिपसाठी अर्ज भरण्याची १७ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. पदांचा तपशील- फिटर- २२० पदं वेल्डर (गॅस आणि इलेक्ट)- ११ पदं मॅकेनिक (डीएसएल)- ७२ पदं मॅकेनिस्ट- ११ पदं पेंटर- ११ पदं कारपेंटर- ११ पदं इलेक्ट्रिशियन- ९९ पदं ब्लॅकस्मिथ- ११ पदं योग्यता- या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कमीत कमी १० वीत ५० टक्के असणं आवश्यक आहे. याशिवाय त्यांच्याकडे संबंधित पदासाठी आवश्य असलेले आयटीआय सर्टिफिकिट असणं बंधनकारक आहे. वयोमर्यादा- या पदांसाठी अर्जधारकाचे वय १५ वर्ष ते २४ वर्ष यादरम्यान असणं बंधनकारक आहे. असा करा अर्ज- या अप्रेंटिसशिपसाठी उमेदवाराला लेखी अर्ज Personnel Dept. (R&D Section) North Central Railway, Jhasnsi U.P. 284003 या पत्त्यावर पाठवा. अॅप्रेंटिसशिपची ट्रेनिंग १ वर्षाची असेल. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी ncr.indianrailways.gov.in या वेबसाइटला भेट द्या. VIDEO: पुण्यात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात