मुंबई, 18 डिसेंबर : स्त्रिया भावनिक होऊन तर पुरुष सारासार विचार करून निर्णय घेतात, असा सर्वांचा समज असतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त भावनिक असतात, असं म्हटल जातं. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर तुमचा समज चुकीचा आहे. अमेरिकेतील मिशिगन युनिव्हर्सिटीनं (University of Michigan) केलेल्या अभ्यासात असं आढळलं की, महिला आणि पुरुष (male Emotional Behavior) दोघांचीही इमोशनल लेव्हल म्हणजे मानसिक पातळीसारखीच असते. या अभ्यासामध्ये, 75 दिवसांसाठी 142 स्त्री-पुरुषांच्या दैनंदिन दिनचर्येतील सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पैलूंचा अभ्यास करण्यात आला. कोरोना महामारीचा उद्रेक होण्यापूर्वी हा अभ्यास करण्यात आला होता. आपल्या निरीक्षणांच्या आधारे, पुरुषही स्त्रियांप्रमाणेच इमोशनल (Female Emotional Behaviour) असतात, असा दावा मिशिगन विद्यापीठातील मानसशास्त्र (Psychology) विभागातील सहाय्यक प्राध्यापक अॅड्रीन बेल्ट्झ (Adriene Beltz) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. आपल्याकडे सुरुवातीपासून महिलांना जास्त भावनिक समजलं जातं. मात्र, हा दृष्टीकोन चुकीचा आहे, असं अभ्यासकाचं म्हणणं आहे. आपला निष्कर्ष सिद्ध करण्यासाठी त्यांनी खेळाच्या मॅचचं उदाहरण दिलं आहे. एखाद्या मॅचमध्ये पुरुषांच्या भावनिक होण्याला आपण ‘पॅशन’चं नाव देतो तर महिलांच्या भावनिक होण्याला ‘लॉजिकलेस’ समजतो. हॉर्मोनल चेंजेसला इमोशनल म्हणणं चुकीचं पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरामध्ये जास्त हॉर्मोनल चेंजेस (Hormonal changes) होतात, हे विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे. या गोष्टीमुळे महिलांमध्ये होणारे भावनिक बदलदेखील जास्त असतात. परिणामी त्या पुरुषांपेक्षा जास्त भावनिक वाटतात. मात्र, मिशिगन युनिव्हर्सिटीतील अभ्यासकांच्या मते, हॉर्मोनल चेंजेसला इमोशनचा टॅग (Emotion tag) लावणं चुकीचं आहे. हॉर्मोनल चेंजेसमुळे व्यक्तीच्या वर्तणुकीमध्ये बदल होतात ही खरी गोष्ट आहे. पण, त्याला इतर गोष्टीही कारणीभूत असतात. इमोशनल गोष्टी हाताळण्यात महिला असतात जास्त सक्षम इमोशनल गोष्टींना सामोरं जाण्यात महिला पुरुषांच्या पुढे असल्याचं दिसून आलं आहे. भारत, इराण, श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये झालेल्या अभ्यासात हे लक्षात आलं आहे. एकत्र काम करणाऱ्या महिला आणि पुरुषांचा अभ्यास केला असता महिला भावनिकदृष्ट्या जास्त खंबीर असल्याचं सिद्ध झालं होतं. मिशिगन युनिव्हर्सिटीतील अभ्यासकांचं संशोधन हे भारत, इराण आणि श्रीलंकेतील पूर्वीच्या संशोधनाला पाठबळ देत आहे. यामुळे महिला जास्त इमोशनल असतात, या जुन्या समजूतीला शह मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.