मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर...'

अखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलला हिमांश, 'मी जर वाईट केलं असतं तर...'

'ब्रेकअप झाल्यानंतर नेहाला वाटलं ते तिने केलं. कारण त्यावेळी ती निराश होती. मी जर काही वाईट केलं असतं, तर...'

'ब्रेकअप झाल्यानंतर नेहाला वाटलं ते तिने केलं. कारण त्यावेळी ती निराश होती. मी जर काही वाईट केलं असतं, तर...'

'ब्रेकअप झाल्यानंतर नेहाला वाटलं ते तिने केलं. कारण त्यावेळी ती निराश होती. मी जर काही वाईट केलं असतं, तर...'

मुंबई, 18 मे: सिंगर नेहा कक्करने (Neha Kakkar) पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंगबरोबर (Rohanpreet Singh) लग्न केलं. त्याआधी ती अभिनेता हिमांश कोहलीबरोबर (Himansh Kohli) रिलेशनशिपमध्ये (relationship) होती. काही वर्षांपूर्वी त्या दोघांचा ब्रेक-अप झाला होता. हिमांश त्याच्या आणि नेहाच्या नात्याबद्दल बऱ्याचदा व्यक्त झाला आहे. तर, नेहाने टीव्हीवर अनेक कार्यक्रमांमध्ये तिच्या ब्रेक-अप (break up) बद्दल सांगितलं होतं. मात्र, यादरम्यान तिने हिमांशवर कोणतेही आरोप केले नव्हते. आता नुकताच एका मुलाखतीत हिमांशने पुन्हा त्याच्या ब्रेक अपबद्दल काही गोष्टी सांगितल्या. याबाबत नवभारत टाईम्सने वृत्त दिलंय.

हिमांश म्हणतो, ‘माझ्या ब्रेकअपबद्दल जगाला गोष्टी एक्सप्लेन करण्याची मला गरज वाटत नाही. मी वाईट नाहीए, तसंच मला नेहालाही दोषी ठरवायचं नाही. ती या गोष्टीतून बाहेर पडून आयुष्यात पुढे गेलीए, ती खूश आहे आणि मी तिच्यासाठी खूश आहे. मीही मला जसं जगावं वाटतंय तसं जगतोय. मात्र काही लोक अजूनही 2018 मध्येच आहेत. ते त्यातून बाहेर पडलेले नाहीत.

सोनालीचं वऱ्हाड लंडनऐवजी पोहोचलं दुबईत; कधी, कुठे, कसं ठरलं आणि झालंही लग्न

मला वाटतंय की, मी जर काही वाईट केलं असतं, तर मी सुखाने झोपू शकलो नसतो. ब्रेकअप झाल्यानंतर नेहाला वाटलं ते तिने केलं. कारण त्यावेळी ती निराश होती, रागात आणि तणावात होती. त्यामुळे तिने सोशल मीडियावर (Social Media) आमच्या नात्याविषयी बरच काही पोस्ट केलं. मात्र, मी काहीच पोस्ट केलं नाही. नातं संपलं तेव्हा आमच्यात ना प्रेम होतं ना राग होता. त्यामुळे जे काही होतं ते आम्ही नीट सांभाळून घेतलं असतं तर लोक काहीच बोलले नसते. जे लोक एखाद्या व्यक्तीसोबत नातं संपल्यानंतर चांगलं-वाईट बोलतात, त्यांच्यासाठी हा खूप मोठा धडा आहे,’ असंही हिमांश म्हणाला.

अरे, घर आहे की महाल? नेहा कक्करच्या आलिशान घराचे PHOTO पाहून चाट व्हाल!

आपण रिलेशनशिपमध्ये असल्यानंतर एकमेकांच्या कुटुंबीयांसारखे असतो. त्यामुळे त्यांच्यापासून दूर जाणं हे वेदनानायी असतं. काही लोक या गोष्टी मागे सोडून आयुष्यात पुढे जातात. तर, काहींना वेगळं झाल्यानंतर त्यांच्या पार्टनरमध्ये बऱ्याच चुका आढळतात. काही जण मित्र-परिवाराकडून (Friends) सहानुभूती घेऊन आपल्या पार्टनरला दोष देतात. मात्र, दोष दोघांचाही असतो, हे कुणीच बघत नाही, असं हिमांश म्हणाला. त्याने सांगितलं,‘माझ्या आणि नेहाच्या नात्यात प्रेम राहीलं नव्हतं,तसेच रागदेखील नव्हता. मात्र, तरीही नातं तुटण्यास नेहाने मला जबाबदार ठरवलं त्यामुळे मला मनस्ताप झाला.’

ब्रेकअप नंतर नेहा लवकर मूव्ह ऑन झाली. मात्र, हिमांशसाठी ब्रोकन हार्ट सिंड्रोमधून बाहेर पडणं कठीण झालं होतं. त्याच्याबद्दल मीडियात बोलल्या गेलेल्या गोष्टींचा खूप त्रास झाला. मात्र,त् याने स्वतःला सांभाळलं आणि नेहाच्या कोणत्याच आरोपांवर स्पष्टीकरण न देत आयुष्यात पुढे गेला.

दरम्यान, रोहनसोबत लग्न केल्यानंतर नेहा खूश आहे. हिमांश आणि नेहा या दोघांमध्ये कोणत्याच प्रकारचा संवाद नाही.

First published:

Tags: Break up, Neha kakkar, Relationship