मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

National Organ Donation Day 2021: अवयवदान करणं का आहे महत्त्वाचं? राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त त्याचे महत्त्व जाणून घ्या

National Organ Donation Day 2021: अवयवदान करणं का आहे महत्त्वाचं? राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त त्याचे महत्त्व जाणून घ्या

National Organ Donation Day 2021: भारतात अवयवदानाचं प्रमाण नेहमीच कमी राहिलं आहे. अंदाजानुसार, प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे स्पेनमध्ये 35 आणि अमेरिकेमध्ये 26 अवयवांचं दान केलं जातं. या तुलनेत भारतात हे प्रमाण केवळ 0.65 अवयव दान एवढं कमी आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : गेल्या 10 वर्षांपासून भारतात दरवर्षी 27 नोव्हेंबरला 'राष्ट्रीय अवयवदान दिवस' (National Organ Donation Day) साजरा केला जातो. अवयवदान दिनाचा मुख्य उद्देश लोकांना याविषयी जागरूक करणं तसेच आरोग्य सेवा आणि मानवजातीसाठी मृत शरीराद्वारे केलेलं अवयवांचं नि:स्वार्थ योगदान ओळखणं हा आहे. त्याचबरोबर आपला मानवतेवरचा विश्वास पुन्हा प्रस्थापित व्हायला हवा. 2010 साली प्रथमच अवयवदान दिन साजरा करण्यात आला. हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (NOTTO) द्वारे आयोजित केला जातो. अवयव दान करू इच्छिणाऱ्यांना ऑनलाइन पोर्टलवर (National Organ Donation Day 2021) नोंदणी करावी लागते.

भारतात अवयवदानाचं प्रमाण नेहमीच कमी राहिलं आहे. अंदाजानुसार, प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे स्पेनमध्ये 35 आणि अमेरिकेमध्ये 26 अवयवांचं दान केलं जातं. या तुलनेत भारतात हे प्रमाण केवळ 0.65 अवयव दान एवढं कमी आहे.

कोविड-19 मुळे अवयवदानात मोठी घट

कोविड-19 महामारीमुळं (COVID19 Pandemic), गेल्या काही महिन्यांत भारतासह जगभरात अवयवदानात मोठी घट झाली आहे. द लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं म्हटलंय की, ज्या देशांमध्ये संक्रमणाचं प्रमाण जास्त आहे, तेथे अवयवदानात 50 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. विशेषत: मार्चमध्ये लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये यात 70 टक्क्यांपर्यंत घट झाली होती. साथीच्या आजाराच्या काळात, बहुतेक लोकांनी रुग्णालयात जाणं टाळलं, ज्यामुळे अवयवदान करणं अधिक कठीण झालं.

हे वाचा - cancer : कॅन्सरची अशी असतात लक्षणं, बहुतेक लोक शरीरातील या बदलांकडे करतात दुर्लक्ष

किती आवश्यक आहे आणि किती?

भारतात केवळ 3 टक्के नोंदणीकृत अवयवदाते आहेत. साथीच्या आजारापूर्वीही भारतात अवयवदानाचं प्रमाण नेहमीच कमी होतं. 2019 मध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 1.5-2 लाख लोकांना दरवर्षी मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. परंतु, केवळ 8,000 (4 टक्के) ते करतात. त्याचप्रमाणे दरवर्षी सुमारे 80,000 रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असते, परंतु त्यापैकी केवळ 1,800 प्रत्यारोपण होतं. त्याच वेळी, सुमारे 1 लाख रूग्णांना दरवर्षी कॉर्निया किंवा नेत्र प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. परंतु, अर्ध्याहून कमी रुग्णांना ते मिळतं. हृदयरोगींसाठी देखील, हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या 10,000 पैकी केवळ 200 दात्यांसोबत जुळतात.

हे वाचा - दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या

अवयवदान कमी होण्याची कारणं

अवयवदानाचं प्रमाण कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे दान प्रक्रियेबाबत लोकांमध्ये असलेला जागृतीचा अभाव. अनेक स्वयंसेवी संस्था आणि सार्वजनिक संस्था याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असल्या तरी, लोकसंख्येच्या मोठ्या वर्गाला याची माहिती नाही.

First published:

Tags: Health, Organ donation