मुंबई, 1 जुलै : आज (1 July) देशभरात डॉक्टर्स डे (Doctors Day) साजरा केला जातो. आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरांना देवासमान मानलं जातं. आपण देवानंतर कोणाकडे आयुरारोग्य मागत असू, तर ते डॉक्टर्स आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिला डॉक्टरची ओळख करून देणार आहोत, ज्यांनी जगाची बंधनं झुगारून स्वतःच्या मनातली इच्छा पूर्ण केली. वयाच्या 67व्या वर्षी देखील अनोख्या पद्धतीनं आयुष्य जगणाऱ्या डॉ. गीता प्रकाश (Dr. Geeta Prakash) अनेकांच्या आदर्श बनल्या आहेत.
लहानपणापासून होतं डॉक्टर बनण्याचं स्वप्न
डॉ. गीता प्रकाश यांचं बालपण सिमल्यात गेलं. त्यांचं बालपण (Childhood) खूपच रंजक होतं. आपण डॉक्टर व्हावं, असं त्याचं लहानपणापासून स्वप्न होतं. त्या मोठ्या झाल्या तरी ते स्वप्न कायम होतं. यासाठी त्यांच्या आईनं त्यांना खूप मदत केली. कुटुंबीयांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे त्या वयाच्या 21व्या वर्षी डॉक्टर बनल्या. डॉक्टर (Doctor) म्हणून त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली. त्यांचा हा प्रवास खूप सुंदर होता. या नोकरीच्या काळातच त्यांना त्यांचा आयुष्याचा जोडीदार भेटला.
पहिल्यांदा डॉक्टर, मग शिक्षिका आणि त्यानंतर आरजे
लग्नानंतर घर सांभाळून त्यांनी मुलांना वाढवलं आणि काळ झपाट्यानं पुढे सरकत राहिला. डॉ. गीता आता स्थिरावल्या होत्या आणि
आयुष्यदेखील (Life) चांगलं चाललं होतं; मात्र आपण काही तरी वेगळं केलं पाहिजे अशी जिद्द त्यांच्या मनात कायम होती. यामुळे डॉक्टर झाल्यानंतरही त्यांनी इतर गोष्टींसाठी प्रयत्न सुरू केला. आपल्या दोन्ही मुलांचं संगोपन करताना, त्यांना पूर्ण वेळ देता यावा यासाठी त्यांनी शाळा जॉइन केली. त्यानंतर वयाच्या 50व्या वर्षी त्यांच्या मनात वेगळेच सूर उमटू लागले आणि त्या आरजे (RJ) झाल्या. त्या श्रोत्यांना हेल्थ टिप्स (Health Tips) शेअर करायच्या.
वयाच्या 57 वर्षी बनल्या मॉडेल
काळ पुढे सरकत होता. डॉ. गीता यांना आरजेच्या भूमिकेतून आनंद मिळत होता. याचदरम्यान डॉ. गीता यांच्या एका पेशंटने त्यांना मॉडेलिंगची (Modelling) ऑफर दिली. डॉ. गीता यांना या प्रवासात त्यांच्या मुलांकडून प्रेरणा मिळाली. 'आई, तू हे काम यशस्वीपणे करू शकतेस,' असा विश्वास मुलांनी दिला. सुरुवातीच्या काळात आई आणि नंतर मुलांकडून मिळालेल्या प्रेरणेच्या बळावर डॉ. गीता यांनी मॉडेलिंग सुरू केलं. मॉडेलिंग सुरू केल्यानंतर त्यांना अनेक लोकप्रिय ब्रॅंड्ससाठी काम करण्याची संधी मिळाली. ज्वेलरी, ड्रेसिंगसह अनेक गोष्टीचं ब्रॅंडिंग करणाऱ्या डॉ. गीता यांना फेमिना (Femina) या नियतकालिकाने कव्हर पेजवर स्थान दिलं.
मुलाच्या गळ्यात नाणं अडकलंय? लगेच करा हे उपाय, नाहीतर...
'माझ्यासाठी लाडू आणतात तेव्हा मला आनंद होतो'
न्यूज 18शी बोलताना डॉ. गीता म्हणाल्या, `मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. मी जे काही मिळवलं त्यामागे माझ्या कुटुंबाचा पाठिंबा आणि देवाचे आशीर्वाद आहेत. आज जागतिक डॉक्टर्स दिन आहे. मला माझ्या प्रोफेशनबद्दल खूप छान वाटतं. जेव्हा माझ्या पेशंट्सचे नातेवाईक माझ्यासाठी दोन-तीन लाडू किंवा शेंगदाणे घेऊन येतात, तेव्हा मला मनातून खूप समाधान वाटतं. आपल्या कुटुंबातला सदस्य पूर्ण बरा झाल्याचा त्यांचा आनंद माझ्या मनाला मोठं समाधान देऊन जातो.`
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.