कोरोनानं नोकरी हिरावली, जिद्दीच्या बळावर सुरू केला बिझनेस, आता महिन्याला कमावतो लाखभर

कोरोनानं नोकरी हिरावली, जिद्दीच्या बळावर सुरू केला बिझनेस, आता महिन्याला कमावतो लाखभर

कोरोना आणि लॉकडाउनच्या (Coronavirus Pandemic) काळात विविध संधी हिरावल्या गेल्यानं जगभरात अनेक लोक अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी नरेनची ही कथा आवर्जून वाचली पाहिजे.

  • Share this:

जम्मू, 27 जानेवारी : जम्मू काश्मीरच्या नरेन सराफनं हॉटेल मॅनेजमेंटचा (hotel management) कोर्स केला. त्याचं स्वप्न ताज हॉटेलमध्ये नोकरी (job) करण्याचं होतं. त्याची त्यासाठी निवडही झाली. मात्र तेव्हाच कोरोनाच्या (corona) काळात लॉकडाऊनही (Lock down) लागलं. नोकरी गेली. यानंतर कुणी निराश, अस्वस्थ झालं असतं. पण नरेननं लॉकडाऊनला आव्हान मानलं.

Dainik Bhaskar नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. केवळ 2 महिनेच नरेनची नवी नोकरी चालली. आज मात्र तो दर महिन्याला एक लाख रुपये कमावतो. 23 वर्षाचा नरेन सांगतो, की हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासादरम्यान तो इंटर्नशिपसाठी जोधपूरच्या (Jodhpur) उमेद भवनला गेला. तिथं त्याचं काम सगळ्यांना खूप आवडलं. तिथं त्याची प्रोफाईल बनवून ताज हॉटेलला पाठवली गेली. मार्च 2020 मध्ये नरेनची निवडही झाली. सप्टेंबरमध्ये त्याला तिथं जॉईन करायचं होतं. कोरोनामुळं ते सगळं राहून गेलं. हातात असलेली नोकरीही गेली.

यादरम्यानच त्याला असं वाटलं, की हातात असलेल्या वेळात काहीतरी भन्नाट रेसिपी बनवू यात. यानंतर त्यानं काही व्हेज (Veg)आणि नॉनव्हेज (non-veg) पदार्थ बनवले. त्यानं बनवलेल्या पदार्थांची चव लोकांना खूप आवडली. यानंतर नरेननं ठरवलं, की आता तो स्वतःचंच रेस्टॉरंट (restaurant) उघडेल.

नरेननं 'आउट ऑफ द बॉक्स' नावाच्या एका रेस्टॉरंटची सुरवात केली. त्यानं केवळ खाण्याच्या चवीवर लक्ष केंद्रित केलं. तो म्हणतो, टलोकांच्या मनापर्यंत पोचायचं असेल, तर त्यांच्या जिभेच्या माध्यमातूनच ते होऊ शकतं.' नरेननं स्पेशल मेन्यू तयार केला. त्यात नॉर्थ इंडियन व्हेज-नॉनव्हेज, साऊथ इंडियन, गाली स्टाइल फिश, कीमा राजमा असेही पदार्थ आहेत. यासोबतच तरुणांच्या चवीला लक्षात घेऊन काबुली कबाब आणि बर्गरही तो बनवत असतो.

नरेननं गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या बिझनेसची (business) घरून सुरवात केली. सुरवातीला तो केवळ ओळखीच्या लोकांमध्ये पदार्थ पोचवत असे. आता मात्र त्यानं सोशल मीडियाची मदत घेत अजून कस्टमर्स जोडले. आता त्यानं होम डिलिव्हरीसुद्धा सुरू केली आहे. नरेन घरातल्या किचनमध्येच हे सगळे पदार्थ तयार करतो. आता रोज त्याला किमान 8 ते 10 ऑर्डर्स मिळतात. रोज तो तीन ते चार हजार रुपये कमावतो. त्यानं दोन लोकांना मदतीला ठेवलं असून घरचे लोकही सतत त्याच्या पाठीशी असतात.

Published by: News18 Desk
First published: January 27, 2021, 2:34 PM IST

ताज्या बातम्या