मुंबई, 5 जुलै : वाढदिवस, लग्न, पार्टी किंवा कोणताही विशेष प्रसंग आणखी अविस्मरणीय करण्यासाठी केक लागतोच. कोणत्याही कार्यक्रमाचा गोडवा केकमुळे वाढतो. त्यामुळे सेलिब्रेशन म्हंटलं की सर्वांना पहिल्यांदा केकची आठवण होते. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना केक आवडतो. हा केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य? कमी किंमतीमध्ये मुंबईत कुठं मिळतं याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये केक बनवणारं सर्व साहित्य होलसेल दरामध्ये खरेदी करता येते. या मार्केटमध्ये अगदी 10 रुपयांपासून हे साहित्य उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक मुंबईकर ही सर्व खरेदी करण्यासाठी आवर्जून क्रॉफड मार्केटमध्ये येतात.
कोणत्या वस्तू उपलब्ध? केक बनवण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या आकाराचे चॉकलेट मोल्ड, , पॉप्सिकल्स मोल्ड, रंगेबिरंगी खाण्याचे कलर, मिक्सिंग बाउल, कागदाचे त्याच बरोबर मेटलचे कपकेक मोल्ड, चॉकलेट कंपाऊंडचे प्रकार, खाण्याचे ग्लिटर, पॅलेट नाइफ, स्प्रे पम्प, वेगवेगळ्या आकाराचे क्रीम नोझल, स्प्रे कलर, विविध फ्लेवरचे क्रश, स्प्रिंकलर, केक सजवण्यासाठी टॉपर, डॉल, रिबीन्स, केक बनवण्यासाठी टर्निंग टेबल, क्रीम स्क्रॅपर, किलोनुसार केकचे मोल्ड असं सर्व सामान होलसेल दरामध्ये या बाजारात मिळतं. किती आहे किंमत? केक बनवण्यासाठी लागणारं क्रिम नोझलं हे फक्त 10 रुपयांना मिळतं. क्रीम स्क्रेपर आणि खाण्याचे ग्लिटर 20 रुपये, चॉकलेट मोल्ड 40 रुपये स्प्रिंकलर, क्रश हे 60 ते 80, केकमोल्ड 100 केकचे प्रीमिक्स हे फक्त 170 रुपयांंमध्ये इथं खरेदी करता येतं,’ अशी माहिती येथील फरीद केक शॉपचे व्यवस्थापक गुफ्रान शम्सी यांनी दिली. प्रत्येक बेकरच्या क्रिएटिव्हीटीला चालना देणाऱ्या वस्तू आमच्याकडं स्वस्त दरामध्ये मिळतात, असं शम्सी यांनी स्पष्ट केलं.