मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मेंदूज्वर म्हणजे काय आणि तो कसा रोखता येऊ शकतो?

मेंदूज्वर म्हणजे काय आणि तो कसा रोखता येऊ शकतो?

मेंदूज्वर हे एक गंभीर इन्फेक्शन आहे, ज्याचा मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवतीच्या संरक्षक थरावर परिणाम होतो.

मेंदूज्वर हे एक गंभीर इन्फेक्शन आहे, ज्याचा मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवतीच्या संरक्षक थरावर परिणाम होतो.

मेंदूज्वर हे एक गंभीर इन्फेक्शन आहे, ज्याचा मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवतीच्या संरक्षक थरावर परिणाम होतो.

सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या काळात लसीकरणाची भूमिका खूप महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्यामुळे या जीवघेण्या महामारीपासून तुमचे संरक्षण होते*.

न्यूमोकोकल न्यूमोनियासारखेच, व्हायरस आणि बॅक्टेरियाद्वारे पसरलेले इतर अनेक आजार लस प्रतिबंधित आहेत. असाच एक आजार म्हणजे मेनिंगोकोकल मेनिंजायटिस (मेंदूज्वर). या आजारात मृत्यूदरही जास्त आहे1.

मेनिंगोकोकल मेनिंजायटिस (मेंदूज्वर) प्रामुख्याने लहान मुलांना होतो आणि जर त्यावर उपचार केले नाही तर मेंदूला गंभीर इजा होऊ शकते2-4. या रोगाबद्दलची महत्त्वाची प्रत्येक गोष्ट येथे नमूद केली आहे आणि तुम्ही त्यापासून कसा बचाव करू शकता याचीही माहिती येथे देण्यात आली आहे.

मेंदूज्वर म्हणजे काय?

मेंदूज्वर हे एक गंभीर इन्फेक्शन आहे, ज्याचा मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवतीच्या संरक्षक थरावर परिणाम होतो2,5. हा आजार बॅक्टेरिया, व्हायरस आणि बुरशीमुळे होतो2. मेनिंगोकोकल मेनिंजायटिस (मेंदूज्वर) नायसेरिया मेनिंगिटायडिस बॅक्टेरियामुळे होतो, ज्यामुळे आजाराची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढते#. हा आजार श्वसनाद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होऊ शकतो6,7

लक्षणे दिसल्यानंतर 24 ते 48 तासांच्या आत रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो2. जे रुग्ण बरे झाले, त्यांच्यातील 5 पैकी एका व्यक्तीस श्रवणशक्ती कमी होणे, मेंदूला इजा होणे, मानसिक अपंगत्व किंवा अवयव निकामी होणे अशा समस्यांना जीवनभर सामोरे जावे लागू शकते.8

मेनिंगोकोकल आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो, परंतु पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्ती, पौगंडावस्थेतील आणि तरुणांमध्ये त्याचे प्रमाण जास्त आढळून आले आहे.9

या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आहेत. यापैकी प्रतिबंधकात्मक लसीकरण हा एक उपाय आहे आणि जीव वाचवू शकतो आणि त्याचा त्रास कमी करता येऊ शकतो.6 या व्यतिरिक्त स्वच्छता आणि संक्रमण होऊ शकणाऱ्या गोष्टींपासून लहान मुलांना दूर ठेवणे खूप आवश्यक आहे.6,10  मेनिंगोकोकल आजाराबद्दल काही सामान्य प्रश्न, लक्षणे ज्याकडे आपण लक्ष द्यायला हवे आणि त्यावर उपचार कसा करावा याची माहिती येथे दिली आहे. " isDesktop="true" id="555312" >

मेनिंगोकोकल मेनिंजायटिस (मेंदूज्वर) आजार कसा पसरतो आणि त्याची लक्षणे कोणती आहेत?

खोकला आणि शिंकण्यापासून ते अन्न-पाणी शेअर करणे आणि जवळ-जवळ राहणे या रोजच्या सवयी मेनिंगोकोकल मेनिंजायटिस (मेंदूज्वर) होण्यास कारणीभूत ठरू शकतात.6,7 जीवाणू नाक आणि घशात राहतात आणि संपर्काद्वारे एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरतात.6,7

लक्षणांचा विचार करता मेंदूज्वरामध्ये सर्दी, फ्लू ज्यामुळे त्वरित खूप ताप येतो किंवा थंडी वाजून येते, हात-पाय थंड पडतात, स्नायूंमध्ये तीव्र वेदना निर्माण होतात, अंगावर गडद जांभळे रॅशेस येतात, शरीरातील संवेदना जातात.2

मेनिंजायटिस (मेंदूज्वर) : प्रतिबंधात्मक उपाययोजना   

आपल्या मुलांचे मेनिंगोकोकल आजारापासून संरक्षण करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे लसीकरण.10

वेगवेगळ्या प्रकारच्या मेनिंगोकोकल आजारांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. भारतात उपलब्ध असलेल्या मेनिंगोकोकल ACWY लसीमुळे चार मुख्य प्रकारच्या मेनिंगोकोकल आजारांपासून संरक्षण होऊ शकते.11

मेनिंगोकोकल आजार हा गंभीर आहे आणि त्याचे असंख्य धोके आहेत, परंतु मुलांना वेळेवर लस दिल्यास त्यांना आजारापासून दूर ठेवणे शक्य आहे. जर आपल्या मुलास यापूर्वी लस दिली गेली नसेल तर अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. एकत्रितपणे, आपण मेंदूज्वराविरुद्ध लढू आणि जिंकू शकतो.

संदर्भ:

 1. Centers for Disease Control and Prevention (CDC). Epidemiology and Prevention of Vaccine-Preventable Diseases. 12th ed. Atkinson W, et al, eds. Washington, DC: Public Health Foundation; 2012. http://www.cdc.gov/vaccines/pubs/pinkbook/index.html#chapters;
 2. Thompson MJ; Lancet;2006;367;397-403
 3. Rosenstein NE, et al. N Engl J Med. 2001;344:1378-88
 4. Centers for Disease Control and Prevention (CDC), 2017. Meningococcal Disease. Clinical Information. https://www.cdc.gov/meningococcal/clinical-info.html
 5. Centers for Disease Control and Prevention (CDC), 2017. Meningococcal Disease. Signs and Symptoms
 6. World Health Organization (WHO), 2018. Meningococcal meningitis. Factsheet.
 7. Centers for Disease Control and Prevention (CDC), 2017. Meningococcal Disease. Causes and Spread to Others
 8. Centers for Disease Control and Prevention (CDC), 2017. Meningococcal Disease. Diagnosis and treatment
 9. Centers for Disease Control and Prevention (CDC), 2017. Meningococcal Disease. Clinical Information. https://www.cdc.gov/meningococcal/clinical-info.html (Accessed Apr 2021)
 10. Centers for Disease Control and Prevention (CDC), 2018. Meningococcal Disease. Prevention
 11. ACVIP Immunization update 2021, available at https://www.indianpediatrics.net/jan2021/jan-44-53.htm (Accessed Apr 2021)

# https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/meningococcal-meningitis#:~:text=Meningococcal%20meningitis%20is%20observed%20in,preschool%20children%20and%20young%20people.

*https://www.cdc.gov/vaccines/hcp/conversations/downloads/vacsafe-understand-color-office.pdf

 

Disclaimer: Issued in public interest by GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited. Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 030, India. Information appearing in this material is for general awareness only. Nothing contained in this material constitutes medical advice. Please consult your physician for medical queries, if any, or any question or concern you may have regarding your condition. Please consult your Paediatrician for the complete list of Vaccine preventable diseases and the complete vaccination schedule for each disease .Please report adverse events with any GSK product to the company at india.pharmacovigilance@gsk.com.

CL code: NP-IN-MNV-OGM-210002, DoP Apr 2021

First published: