
चेहरा थंड पाण्याने धुवा : सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवावा. थंड पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेवरील पोअर्स बंद होतात. थंड पाणी आपल्या चेहऱ्यासाठी अँटी रिंकल एजेंटच्या स्वरुपातही कार्य करते. यामुळे त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. तसेच सूर्याच्या हानिकारक किरणांपासूनही आपल्या त्वचेचे संरक्षण होते. सकाळी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुतल्यास चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होण्यास मदत होईल.

फेसपॅक: आयुर्वेदानुसार मुलतानी मातीचे त्वचेसाठी भरपूर फायदे आहेत. तेव्हा सकाळच्या सुमारास चेहरा स्वच्छ धुऊन त्याच्यावर मुलतानी मातीचा फेस पॅक लावू शकता. मुलतानी मातीतील औषधी गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील सर्व प्रकारची घाण, धूळ, मातीचे कण स्वच्छ होण्यास मदत मिळेल. मुलतानी मातीच्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स देखील कमी होऊन चेहरा अधिक चमकदार होण्यास मदत होते. याशिवाय तुम्ही होममेड फेसपॅक देखील वापरू शकता.

त्वचा हायड्रेट ठेवा : आपले शरीर आणि त्वचा हायड्रेट राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी द्रव पदार्थांचे सेवन फायदेशीर ठरते. त्वचा हायड्रेट राहण्यासाठी शरीर डिटॉक्स होणं गरजेचं आहे. शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स केल्यास त्वचेवर चमक येण्यास मदत मिळते. यासाठी दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून देखील पिऊ शकता तसेच सकाळी नारळ पाणी पिणे देखील फायदेशीर ठरू शकते.त्वचा हायड्रेट ठेवा : आपले शरीर आणि त्वचा हायड्रेट राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी द्रव पदार्थांचे सेवन फायदेशीर ठरते. त्वचा हायड्रेट राहण्यासाठी शरीर डिटॉक्स होणं गरजेचं आहे. शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स केल्यास त्वचेवर चमक येण्यास मदत मिळते. यासाठी दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी प्यावे. कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून देखील पिऊ शकता तसेच सकाळी नारळ पाणी पिणे देखील फायदेशीर ठरू शकते.

ग्लिसरीनचा वापर करा :
गुलाब पाणी, लिंबू रस एकत्र करा आणि यामध्ये ग्लिसरीन देखील मिक्स करा. हे मिश्रण सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर लावावे. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर आपला संपूर्ण चेहरा आणि मानेवर हे नॅचलर सीरम लावा. ग्लिसरीन आपल्या चेहऱ्यासाठी क्लींझरच्या स्वरुपात काम करते. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जमा झालेली घाण आणि तेल स्वच्छ होते. ग्लिसरीनमध्ये मॉइस्चराइझिंग चे गुणधर्म असतात त्यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा देखील कमी होतो.

सनस्क्रीमचा वापर : सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्यावर तसेच मान, हात आणि पायांवर सनस्क्रीम लावणे गरजेचे आहे. सनस्क्रीम लावून बाहेर पडल्यामुळे सूर्याच्या किरणांचा आपल्या त्वचेशी थेट संपर्क होत नाही त्यामुळे टॅनिंग सारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.

मॉइश्चराइजर : सकाळी आंघोळ केल्यावर त्वचा मॉइश्चराइज करायला विसरू नका. आंघोळ केल्यानंतर काहीकाळ आपल्या त्वचेवरील छिद्र ओपन असतात. त्यामुळे याच वेळी जर त्वचेवर मॉइश्चराइजर लावले तर ते त्वचेत नीट मुरते. त्यामुळे आपली त्वचा कोरडी होत नाही आणि मुलायम राहण्यास मदत मिळते.

सनस्क्रीमचा वापर : सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्यावर तसेच मान, हात आणि पायांवर सनस्क्रीम लावणे गरजेचे आहे. सनस्क्रीम लावून बाहेर पडल्यामुळे सूर्याच्या किरणांचा आपल्या त्वचेशी थेट संपर्क होत नाही त्यामुळे टॅनिंग सारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.