जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सकाळी तोंडातून येतो घाण वास? या 5 टिप्समुळे दूर होईल दुर्गंधी!

सकाळी तोंडातून येतो घाण वास? या 5 टिप्समुळे दूर होईल दुर्गंधी!

सकाळी तोंडातून येतो घाण वास? या 5 टिप्समुळे दूर होईल दुर्गंधी!

तोंडाचा वास अथवा दुर्गंधी येणं ही सामान्य समस्या झाली आहे. मात्र, आपण या परिस्थितीतून जाणारी पहिली व्यक्ती नाही. कारण, अनेकजण या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 21 जून : आपण आवडीचे पदार्थ आनंदाने खातो आणि वेळ पडली तर नंतर पाचक पदार्थ खातो. खाणं ही गरज आहे; पण आवड असेल तर त्या पदार्थावर ताव मारतो. पोट भरलं की आपल्याला मनालाही शांत वाटतं. पोटाची काळजी घेतो तसं आपल्या तोंडाची काळजी घेणंही गरजेचं असतं नाहीतर तोंडासंबंधी आजार होऊ शकतात. तोंडाचा वास अथवा दुर्गंधी येणं ही सामान्य समस्या झाली आहे. मात्र, आपण या परिस्थितीतून जाणारी पहिली व्यक्ती नाही. कारण, अनेकजण या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही दुर्गंधी रोखण्यासाठी अनेक उपायही केले जातात, काही जण नियमित सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करतात, पण समस्या कायम राहते. सकाळी उठल्यावर परत तोंडातून दुर्गंधी येतेच, मग प्रश्न येतो तो, की हे नेमकं कशामुळे होतं आणि ही समस्या रोखायची तरी कशी? यासाठी खालील टिप्स निश्चितच उपयोगी ठरू शकतात. खरं तर शरीराची नियमित स्वच्छता जशी ठेवली जाते तशीच दातांची निगाही महत्त्वाची असते, श्वासाची दुर्गंधी सामान्यतः खाण्या-पिण्यातून येते. वास्तविक, अन्नाचे तुकडे दातांमध्ये अडकतात आणि रात्रभर तोंडात अडकल्यामुळे श्वासाला दुर्गंधी येते. रात्री ब्रश करून झोपणं हा स्वच्छतेचा एक भाग झाला. पण रात्रीत अन्नाचे कण जितके जास्त वेळ तोंडात राहतील तितके बॅक्टेरिया (Bacteria) वाढतात, ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी येते. याबाबत उत्तर स्पेनचे प्रसिद्ध ऑर्थोडेंटिस्ट डॉ. खालेद कासेम सांगतात की, दातांमधील दुर्गंधीला घाबरण्याचं कारण नाही, ती सामान्य आहे, त्यावर मातही करता येते. यासाठी डॉ. खालिद यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत, ज्यामुळे या समस्येतून मुक्तता होऊ शकेल. 1. कॅल्शियमयुक्त दही खा दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस (Laptobasils) नावाचे निरोगी बॅक्टेरिया (Bacteria) असतात जे तुमच्या आतड्यातील बॅक्टेरिया संतुलित करण्यास आणि श्वासाची दुर्गंधी कमी करण्यास मदत करतात. फ्लेवर्ड दह्याऐवजी साधं, कॅल्शियमयुक्त, फॅट्स नसलेलं दही खावं. पण तरीही जर हा त्रास सतत वाढत असेल तर एकदा डॉक्टरांना दाखवावं. 2. भरपूर पाणी प्या रात्री आठ तासांच्या झोपेतून उठल्यानंतर तुमचं तोंड कोरडं होऊ शकतं. जेव्हा तोंडात लाळ असते तेव्हा बॅक्टेरिया वाढत नाहीत. जर तोंड कोरडं असेल तर बॅक्टेरिया वाढतात आणि त्यामुळे श्वासाला दुर्गंधी येऊ शकते. पण, जेव्हा झोपतो तेव्हा लाळेचं प्रमाण कमी होतं, म्हणूनच उठल्यावर लगेच तहान लागते. त्यामुळे नेहमी स्वतःला हायड्रेटेड (Haydret) ठेवावं आणि भरपूर पाणी प्यायला हवं. 3. उग्र वास असलेले पदार्थ टाळावेत जर तुम्हाला संध्याकाळी कांदा आणि लसूण खायला आवडत असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी तोंडातून दुर्गंधी येण्यास तेच कारण ठरतं. त्यामुळे रात्री नेहमी संतुलित आहार घ्यायला हवा, ज्यामुळे शरीराचं एकूणच आरोग्य चांगलं राखण्यास मदत होईल. नेहमी असे पदार्थ खावे जे प्लॉक बिल्ड अप काढून टाकतात आणि बॅक्टेरियाशीदेखील लढतात. 4. रोज संत्री खा संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने दात पांढरे होण्यास मदत मिळते. व्हिटॅमिन सी हे लाळेचं प्रमाण वाढवण्यास आणि श्वासाची दुर्गंधी रोखण्यास मदत करतं. त्यामुळे रोज संत्री खावीत. 5. तोंडी दिनचर्या चांगली ठेवा कधीकधी तोंडाच्या स्वच्छतेकडे योग्य लक्ष न दिल्याने सकाळी दुर्गंधी येते. अशा परिस्थितीत तोंडाची दुर्गंधी रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दातांची नियमित स्वच्छता राखणं. तोंडातून अन्नाचे कण काढण्यासाठी, दातांमध्ये फ्लश करावं आणि किमान दोन मिनिटं दात घासावेत. हळूवारपणे हिरड्या, जीभ आणि अगदी तुमच्या गालाच्या आतील बाजूस ब्रश करावेत कारण तिथेही बॅक्टेरिया असू शकतात. नेहमी फ्लोराईड टूथपेस्ट (Floriead) आणि अँटिबॅक्टेरियल माउथवॉश (Mouthwash) वापरावा.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: lifestyle
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात