भीलवाड़ा, 28 मे : आजच्या आधुनिक युगात लोकांचा मोबाईल वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि फेसबुकवर तासंतास सक्रिय असतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ लागला आहे. भिलवाडा, राजस्थानचे अतिरिक्त मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. सीपी गोस्वामी म्हणाले की, कोरोनाच्या काळात ऑनलाइन क्लासेस सुरु झाल्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल देण्यास सुरुवात केली होती. सध्या लहान मुलं असो वा म्हातारी माणसं प्रत्येकाला सतत मोबाईल वापरण्याचे व्यसन जडले आहे. या मोबाईलच्या व्यसनाचा सर्वात जास्त फटका हा लहान मुलांना बसतो. कारण लहान मुलांच्या डोळ्यावर आणि मानसिक स्थितीवर याचा लवकर परिणाम होतो. तेव्हा या फोनचे फायदे अनेक असेल तरी त्याचे तोटे देखील बरेच आहेत. डॉक्टरांनी सांगितले की सतत मोबाईल वापरणे आणि पाहणे यामुळे मुलांच्या हायपोथॅलेमस ग्रंथीचा योग्य विकास होत नाही. त्यांनी सतत मोबाईल फोनचा वापर केला की मुलांना हळूहळू मोबाईल पाहण्याचे व्यसन लागते, त्यामुळे त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होत नाही. जास्त वेळ मोबाईल पाहिल्याने मुलांच्या डोळ्यांवरही दुष्परिणाम होतात. स्मार्ट फोन किती वेळ वापरावा : डॉ. गोस्वामी म्हणाले की, फोन सतत बराच वेळ आणि रात्री उशिरापर्यंत वापरल्याने डोळ्यांच्या बुबुळ (रेटिना) आकसतात, ज्यामुळे डोळ्यांवर खूप परिणाम होतो. यामुळे व्यक्तीची जवळची दृष्टी कमकुवत होऊ शकते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने स्वतःला शिस्त लावावी आणि फोनचा सतत वापर न करता थोड्या थोड्यावेळाने तो वापरावा. फोन सतत कित्येक तास वापरल्याने डोळ्यांना इजा होऊ शकते. तसेच लहान मुलांसाठी ठरविक वेळ ठरवून या दरम्यानच त्यांना फोन वापरण्यासाठी द्यावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.