मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लहान मुलांसारखी कोमल आणि मुलायम त्वचा हवीय; मग अंघोळीवेळी करा हे सोपे उपाय

लहान मुलांसारखी कोमल आणि मुलायम त्वचा हवीय; मग अंघोळीवेळी करा हे सोपे उपाय

तांदळाचं पीठ - 
तांदळाच्या पिठानंही चेहरा धुता येतो. याच्यामुळं चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी निघून जाण्यासोबतच त्वचेचा रंग सुधारण्यास देखील मदत होईल. तांदळाच्या पिठात कॉर्न स्टार्च घालून पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून कोरडी होऊ द्या. पेस्ट सुकल्यावर हातानं चोळून चेहरा स्वच्छ करा. यामुळं त्वचेच्या समस्या दूर होतील.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

तांदळाचं पीठ - तांदळाच्या पिठानंही चेहरा धुता येतो. याच्यामुळं चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी निघून जाण्यासोबतच त्वचेचा रंग सुधारण्यास देखील मदत होईल. तांदळाच्या पिठात कॉर्न स्टार्च घालून पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून कोरडी होऊ द्या. पेस्ट सुकल्यावर हातानं चोळून चेहरा स्वच्छ करा. यामुळं त्वचेच्या समस्या दूर होतील. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

अंघोळ करताना तुम्ही काही सोप्या टिप्स वापरू शकता. अंघोळीच्या बादलीमध्ये काही त्वचेला ओलावा आणि मुलायमपणा देणारे काही नैसर्गिक घटक मिसळता येतात. हे घटक नैसर्गिक, सेंद्रिय आणि आवश्यक तेलांनी समृद्ध आहेत.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 01 ऑक्टोंबर : हिवाळा अवघ्या काही दिवसांवर आहे. या हंगामातील थंडीमुळं (Cold) आपल्याला कडक उन्हापासून आराम मिळतो. मात्र, त्याचबरोबर कोरडेपणासारख्या त्वचेशी संबंधित काही समस्या सुरू होतात. तुम्हालाही बदलत्या वातावरणामुळं कोरड्या त्वचेची समस्या येत असेल. हिवाळ्यात बराच वेळ गरम (Hot Water) किंवा कोमट पाण्यानं आंघोळ करायला खूप मजा येते. मात्र, भरपूर वेळ अंघोळ (Long Bath) केल्यामुळं त्वचा शुष्क होण्याची शक्यता असते. कोरड्या हवामानात त्वचा आणखी कोरडी होते. आधीच कोरडी त्वचा असलेल्या लोकांना याचा जास्त त्रास होतो.

यासाठी अंघोळ करताना तुम्ही काही सोप्या टिप्स वापरू शकता. अंघोळीच्या बादलीमध्ये काही त्वचेला ओलावा आणि मुलायमपणा देणारे काही नैसर्गिक घटक मिसळता येतात. हे घटक नैसर्गिक, सेंद्रिय आणि आवश्यक तेलांनी समृद्ध आहेत. यामुळं त्वचा (soft skin)लहान बाळांसारखी मऊ आणि निरोगी राहील.

लहान मुलांसारखी मुलायम त्वचेसाठी हे पाच घटक अंघोळीच्या पाण्यात मिसळा

  1. खोबरेल तेल

खोबरेल तेल प्रत्येक भारतीय घरात असतंच. ते आंघोळ करताना पाण्यात मिसळलं तर तुमच्या त्वचेतील ओलावा टिकून राहील.

खोबरेल तेल बॅक्टेरियाविरोधी गुणांनीही समृद्ध आहे. त्यामुळं त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. विशेषतः पुरळ, जळजळ, पुरळ, खाज आदींपासून सुटका होते.

  1. एप्सम मीठ

या मिठानं स्नायूंचा त्रास कमी होतो आणि आराम मिळतो. एप्सम मीठ अंघोळीच्या पाण्यात केव्हाही मिसळणं फायदेशीर आहे. हे मॅग्नेशियमनेही समृद्ध आहे. यामुळे  त्वचेवरील अपायकारक घटक निघून जातात आणि ती मऊ, गुळगुळीत बनण्यास मदत होते.

हे वाचा - मोदी सरकारने बदलले नवीन SIM घेण्याचे नियम, आता या ग्राहकांना नाही मिळणार सिम कार्ड

  1. चहाचे झाड आणि निलगिरीचे तेल

त्वचेसाठी चहाच्या झाडाचं तेल जादुई परिणाम घडवून आणतं. पुरळ, चट्टे, जळजळ आणि खाज सुटणारी त्वचेला आराम देण्यासाठी चहाच्या झाडाच्या तेलाचे काही थेंब बादलीत घाला. हे त्वचेला पोषण देतं. तसंच डोक्यातील कोंड्यावरही उपचार करण्यास मदत करतं. चहाच्या झाडाच्या तेलात निलगिरी तेलाचे काही थेंब घाला. यातून त्वचेला जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल. शिवाय निलगिरी तेल फुफ्फुस आणि श्वसन रोगांसाठी फायदेशीर असतं.

  1. ऑलिव्ह ऑईल

आंघोळीच्या बादलीमध्ये दोन चमचे ऑलिव्ह ऑइल मिसळा आणि दोन मिनिटांनी आंघोळ करा. ऑलिव्ह ऑईल नैसर्गिक चरबींनी समृद्ध आहे. यामुळं त्वचा खोलवर मॉइस्चराइज होऊन मुलायम बनते. आंघोळीपूर्वी ऑलिव्ह ऑईलनं मालिश करणं हाही चांगला उपाय आहे. हे आपले कोपर, गुडघे आणि पाय अशा कोरड्या पडणाऱ्या भागांना मुलायमपणा देईल.

हे वाचा - VIDEO : पत्नी डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर पडताच, नवरा शिरला आत; डॉक्टरची केली भयावह अवस्था!

  1. ग्रीन टी

आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यात थोडासा ग्रीन टी देखील घालू शकता. यामुळं त्वचेचं आरोग्य सुधारतं. यासाठी तुम्ही चहाच्या पिशव्या (टी-बॅग्ज) देखील वापरू शकता. ग्रीन टीमधील अँटिऑक्सिडंट्समुळं त्वचेचं पर्यावरणातल्या बदलामुळं झालेलं नुकसान भरून निघेल. याव्यतिरिक्त, वृद्धत्वामुळं त्वचेवर होणारे परिणामदेखील मंदावतील.

First published:

Tags: Skin, Skin care, Skin color