नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : या धावपळीच्या जीवनात बहुतेक नोकरदार तसेच व्यावसायिक लोक त्यांच्या आरोग्याकडं लक्ष देऊ शकत नाहीत. सतत चुकीचा आहार घेतल्यामुळे शरीरात अशक्तपणा येण्याची शक्यता असते. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की शारीरिक दुर्बलतेमुळे तुमच्या लैंगिक शक्तीवरही परिणाम होऊ लागतो. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला दूध आणि खजूर खाण्याचे फायदे सांगत (Health Benefits of milk and Dry dates ) आहोत, ज्यामुळे लैंगिक शक्ती वाढू शकते. देशातील प्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर अबरार मुलतानी यांच्या माहितीनुसार, दूध आणि खजुराचे सेवन पुरुषांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचे नियमित सेवन केल्यास अशक्तपणा दूर होण्यासोबतच इतरही अनेक फायदे मिळतात. दूध आणि खजूरमध्ये कोणते घटक आढळतात खजूरमध्ये मिळणाऱ्या पोषक तत्वांवर नजर टाकली तर त्यात कॅल्शियम, फायबर, झिंक, मॅग्नेशियम आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय त्यात अनेक जीवनसत्त्वे आढळतात ज्यात व्हिटॅमिन ए, सी, ई, के, बी2, बी6, नियासिन आणि थायामिन हे पुरुषांमध्ये स्टॅमिना वाढवण्याचे काम करतात. त्याचबरोबर दुधात आढळणारे कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम यापासून शरीरात ऊर्जा टिकून राहते. दूध आणि खजूर पुरुषांसाठी कसे फायदेशीर आहेत आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शारीरिक दुर्बलता आणि लैंगिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या पुरुषांसाठी दूध आणि खजूराचे सेवन प्रभावी ठरू शकते. या दोन्ही गोष्टींचे नियमित सेवन केल्याने शक्ती वाढते. खजूरमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवण्याचा गुणधर्म असतो. ज्याचा पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी चांगला फायदा होतो, तर दुधाचा उपयोग शक्ती वाढवण्यासाठी केला जातो. दूध आणि खजूर खाण्याचे फायदे 1. स्टॅमिना वाढवते खजुरांमध्ये अमीनो अॅसिड असतात, जे पुरुषांचा स्टॅमिना वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे पुरुषांनी दुधात उकळून त्याचे सेवन केल्यास शरीराला खूप फायदा होतो. हे वाचा - अद्भुत! इवल्याशा फुलपाखरांनी पुसले कासवांचे अश्रू, अद्भुत दृश्य कॅमेऱ्यात कैद; पाहा VIDEO 2. दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर जर तुम्ही श्वसन प्रणालीशी संबंधित आजारांनी त्रस्त असाल तर तुम्ही खजूर आणि दुधाचे सेवन करावे. असे मानले जाते की दूध आणि खजूर एकत्र सेवन केल्यास श्वसनाचे आरोग्य चांगले राहते. 3. वजन वाढण्यास उपयुक्त जर तुमचे वजन कमी असेल आणि तुम्ही वजन वाढवण्याचा विचार करत असाल तर हे पेय तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकते. कारण त्यात प्रथिने पुरेशा प्रमाणात असतात. जे वजन वाढवण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. हे वाचा - …अन् त्या रोमँटिक क्षणानं घेतलं वेगळंच वळण; पत्नीसोबत संबंध ठेवतानाच घडली भयंकर दुर्घटना अशक्तपणा टाळण्यास मदत करते खजूर आणि दुधाचे एकत्र सेवन केल्याने तुम्ही अशक्तपणाच्या आजारापासून वाचू शकता. अशक्तपणा हा कोणत्याही वयाच्या लोकांना येऊ शकतो. मुख्यतः गरोदरपणात स्त्रियांना अशक्तपणाचा सामना करावा लागतो. अशक्तपणामध्ये शरीरात रक्ताची कमतरता असते आणि पीडित व्यक्तीलाही थकवा जाणवतो. खजूरामध्ये लोह असते. हे रक्त बनवण्यासाठी उपयुक्त सिद्ध होते. म्हणूनच डॉक्टर गर्भवती महिलांना खजूर खाण्याचा सल्ला देतात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.