मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Merry Christmas 2020: अशा पद्धतीने डाउनलोड करून पाठवू शकता ख्रिसमसची Whatsapp स्टिकर्स

Merry Christmas 2020: अशा पद्धतीने डाउनलोड करून पाठवू शकता ख्रिसमसची Whatsapp स्टिकर्स

ख्रिसमसच्या शुभेच्छा (Merry Christmas 2020) पाठवण्यासाठी Whatsapp वर वेगवेगळी स्टिकर्स आली आहेत. ती कशी वापरायची?

ख्रिसमसच्या शुभेच्छा (Merry Christmas 2020) पाठवण्यासाठी Whatsapp वर वेगवेगळी स्टिकर्स आली आहेत. ती कशी वापरायची?

ख्रिसमसच्या शुभेच्छा (Merry Christmas 2020) पाठवण्यासाठी Whatsapp वर वेगवेगळी स्टिकर्स आली आहेत. ती कशी वापरायची?

मुंबई, 24 डिसेंबर : ख्रिसमसनिमित्त (Merry christmas) एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी सध्या सोशल मीडियाचा वापर अधिक केला जातो. कोरोनाच्या (Covid19) दहशतीमुळे अनेक जणांना प्रत्यक्षात भेटणं शक्य नसल्यानं Whatsapp किंवा इतर सोशल मीडियावरच शुभेच्छा पाठवू शकता. व्हॉट्सअ‍ॅपवर  वेगवेगळे स्टिकर्स पाठवून सणांच्या शुभेच्छा तुम्ही देऊ शकता. त्यासाठी या माध्यमाने नवीन स्टिकर्सही आणली आहेत.

ख्रिसमसच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी वॉट्सअ‍ॅपवर वेगवेगळे स्टिकर्स आले आहेत. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने नवीन स्टिकर फीचर दिले आहे. व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर(Whatssapp Sticker) पाठवण्यासाठी तुम्हाला काही स्टेप फॉलो करणं गरजेचं आहे.यांच्या मदतीनं तुम्ही आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना स्टिकरच्या माध्यमातून ख्रिसमसच्या शुभेच्छा पाठवू शकता.

या पद्धतीने पाठवा व्हॉट्सअ‍ॅपवर स्टिकर्स

Step 1: मोबाईलवर पहिल्यांदा तुमचं WhatsApp उघडा

Step 2:  तुम्हाला ज्या व्यक्तीला शुभेच्छा पाठवायच्या आहेत त्याचे चॅट उघडा

Step 3: यानंतर इमोजी सेक्शनमध्ये जाऊन स्टिकर या पर्यायावर जा

Step 4:  यामध्ये विविध स्टिकर्स पाहण्यासाठी उजव्या बाजूला असणाऱ्या ‘+’ या जागी क्लिक करा

Step 5: यामध्ये असणाऱ्या विविध स्टिकरमधून स्टिकर निवडून तुम्ही पाठवू शकता. यामध्ये अधिक स्टिकर हवी असल्यास तुम्ही  ‘Get More Stickers’ यावर क्लिक करा

Step 6: यानंतर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाता. याठिकाणी विविध स्टिकर अ‍ॅप तुम्ही डाउनलोड करू शकता

Step 7: याठिकाणी उपलब्ध असणाऱ्या विविध पर्यायांमधून तुम्हाला हवं त्या  अ‍ॅपचं नाव टाका

Step 8: तुम्हाला हवं  ते अ‍ॅप मिळाल्यानंतर तुम्ही ते डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता

Step 9: त्यानंतर पुन्हा व्हॉट्सअ‍ॅपवर जाऊन तुम्हाला हवं ते स्टिकर निवडून तुम्ही मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवू शकता.

ios वर कसं पाठवू शकता स्टिकर

व्हॉट्सअ‍ॅपने ios साठी अजून हे फिचर उपलब्ध करून दिले नसून यावर अजूनही काम सुरु आहे. त्यामुळं ios वापरणाऱ्या व्यक्तींना थोडं वेगळ्या पद्धतीने हे शेअर करण्याची संधी आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या चॅटमध्ये येणारे विविध स्टिकर्स सेव्ह करून ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या व्यक्तीला तुम्ही हे स्टिकर्स पाठवू शकता.

First published:
top videos

    Tags: Social media, Whats app news