जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / menstruation myths: मासिक पाळीविषयीच्या या 3 गैरसमजुती अजूनही तुम्ही धरून ठेवल्या आहेत का? अफवांवर विश्वास ठेवू नका

menstruation myths: मासिक पाळीविषयीच्या या 3 गैरसमजुती अजूनही तुम्ही धरून ठेवल्या आहेत का? अफवांवर विश्वास ठेवू नका

menstruation myths: मासिक पाळीविषयीच्या या 3 गैरसमजुती अजूनही तुम्ही धरून ठेवल्या आहेत का? अफवांवर विश्वास ठेवू नका

काही ठिकाणी मासिक पाळी अपवित्र मानली जाते. कमी माहितीमुळे पीरियड्स संदर्भात लोकांच्या मनात अनेक चुकीचे समज आजही आहेत. त्यातले नेहमी आढळणारे हे 3..

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : आजही स्त्रिया मासिक पाळीविषयी खुलेपणाने चर्चा करण्यास टाळाटाळ करतात. काही ठिकाणी मासिक पाळी अपवित्र मानली जाते. कमी माहितीमुळे पीरियड्स संदर्भात  (menstruation myths related periods) लोकांच्या मनात अनेक चुकीचे समज (Period Myths) आहेत. याविषयी योग्य माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. इतर कोणत्याही आरोग्य समस्यांप्रमाणे मुलींनाही मासिक पाळीविषयी बोलण्यास प्रोत्साहित केले पाहिजे, जेणेकरून लोकांमध्ये कोणतेही गैरसमज राहणार नाही. मासिक पाळीविषयी असलेल्या अनेक अफवांविषयी जाणून घेऊ, ज्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. परंतु लोक अजूनही त्यावर विश्वास ठेवून चूक करतात. पीरियडचे रक्त हे खराब रक्त असते - अनेकांचा असा समज आहे की, मासिक पाळीवेळी येणारे रक्त गलिच्छ, खराब आहे. परंतु, त्याला गलिच्छ म्हटले जाऊ शकत नाही. यात कोणत्याही प्रकारचे विष नाही. रक्तात गर्भाशयाचे ऊतक, म्युकस लाइनिंग आणि बॅक्टेरिया असले तरी ते रक्त दूषित म्हणता येणार नाही. ही एक शारीरिक प्रक्रिया आहे, ज्याबद्दल कोणालाही लाज वाटण्याची गरज नाही. मासिक पाळी 4 दिवसांची असली पाहिजे - प्रत्येक स्त्रीच्या मासिक पाळीचे एक वेगळे चक्र आहे आणि ते पूर्णपणे शरीरावर अवलंबून असते. स्त्रियांना किती काळ मासिक पाळी येते याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. सामान्य चक्राचा कालावधी 2 ते 8 दिवसांपर्यंत असतो. पाळीचा कालावधी 2 पेक्षा कमी किंवा 8 दिवसांपेक्षा जास्त असल्यास आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मासिक पाळीच्या वेळी आंबट गोष्टी खाऊ नका- काही स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी आंबट वस्तू खाणे टाळतात. परंतु, तुम्ही असे करण्याची अजिबात गरज नाही, असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. मासिक पाळी दरम्यान महिलांनी निरोगी आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे आणि मासिक पाळीशी संबंधित समस्या टाळण्यासाठी जंक फूड खाणे टाळा. हे वाचा -  Manike Mage Hithe: ‘कोलावेरी’पेक्षाही जबरदस्त हिट! एव्हाना ऐकलंच असेल हे गाणं, अर्थ कळला का? मासिक पाळी दरम्यान आंघोळ करू नये- मासिक पाळीचा आंघोळ, डोके धुणे, मेक-अप करण्याशी काहीही संबंध नाही. तर नियमित आंघोळ करणे आणि आपल्या गुप्तांगासह सर्व अवयवांची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. चांगली स्वच्छता ठेवल्यामुळं संसर्गाचा धोका कमी होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात