मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /लैंगिक समस्येमुळं नात्यात दुरावा आलाय? हा स्प्रे वाढवेल जोडीदारासोबतची जवळीक

लैंगिक समस्येमुळं नात्यात दुरावा आलाय? हा स्प्रे वाढवेल जोडीदारासोबतची जवळीक

इरेक्टाइल डिस्फंक्शन दूर करण्यासाठी काही पुरुष व्हायग्राचा वापर करतात; पण व्हायग्रा पूर्णतः सुरक्षित नाही. पुरुषांमधली इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या दूर व्हावी, यासाठी संशोधकांनी एक नेझल स्प्रे तयार केला आहे.

इरेक्टाइल डिस्फंक्शन दूर करण्यासाठी काही पुरुष व्हायग्राचा वापर करतात; पण व्हायग्रा पूर्णतः सुरक्षित नाही. पुरुषांमधली इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या दूर व्हावी, यासाठी संशोधकांनी एक नेझल स्प्रे तयार केला आहे.

इरेक्टाइल डिस्फंक्शन दूर करण्यासाठी काही पुरुष व्हायग्राचा वापर करतात; पण व्हायग्रा पूर्णतः सुरक्षित नाही. पुरुषांमधली इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या दूर व्हावी, यासाठी संशोधकांनी एक नेझल स्प्रे तयार केला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 29 मार्च : धावपळीची जीवनशैली, ताणतणाव आदींमुळे हृदयविकार, डायबेटीससारख्या आजारांसोबत लैंगिक समस्यादेखील वाढत आहेत. पुरुषांमधली इरेक्टाइल डिस्फंक्शन ही समस्यादेखील याच कारणांमुळे उद्भवते. इरेक्टाइल डिस्फंक्शन दूर करण्यासाठी काही पुरुष व्हायग्राचा वापर करतात; पण व्हायग्रा पूर्णतः सुरक्षित नाही. पुरुषांमधली इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या दूर व्हावी, यासाठी संशोधकांनी एक नेझल स्प्रे तयार केला आहे. हा स्प्रे व्हायग्राच्या तुलनेत 10 पट अधिक वेगानं काम करतो. या स्प्रेमुळे पुरुषांमधलं इरेक्टाइल डिस्फंक्शन दूर होतं, असा दावा संशोधकांनी केला आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.

    एका अहवालानुसार, अमेरिकेतल्या सुमारे तीन कोटी जणांना इरेक्टाइल डिस्फंक्शनचा त्रास आहे. इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या दूर व्हावी यासाठी प्रामुख्याने व्हायग्राचा वापर केला जातो; पण आता एक नवीन नेझल स्प्रे तयार करण्यात संशोधकांना यश आलं आहे. हा स्प्रे नाकाद्वारे घेता येणार आहे. या स्प्रेमुळे कमी वेळात पौरुषत्व वाढेल, व्हायग्राच्या तुलनेत हा स्प्रे 10 पट वेगानं काम करेल, असा दावा संशोधकांनी केला आहे. या नेझल स्प्रेला स्पॉन्टन असं नाव देण्यात आलं असून, ऑस्ट्रेलियातल्या एका कंपनीनं हा स्प्रे उत्पादित केला आहे. या कंपनीचे संशोधक ली रॉडन यांनी सांगितलं, की, 'या स्प्रेमुळे पुरुषांमधलं इरेक्टाइल डिस्फंक्शन दूर होईल. येत्या दोन वर्षांत हा नवीन नेझल स्प्रे अमेरिकेत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.'

    'या' ठिकाणी महिला, आई होणं तर सोडाच लग्नालाही देत आहेत नकार! हे आहे कारण

    हा नवीन नेझल स्प्रे अत्यंत कमी वेळात परिणाम दाखवायला सुरुवात करतो, असा दावा ऑस्ट्रेलियातल्या `एलटीआर फार्मा`ने केला आहे. या स्प्रेमध्ये व्हरडेनाफिल नावाचं औषध वापरलं गेलं आहे. व्हायग्रामध्ये सिल्डेनाफिल हे औषध वापरलं जातं. स्प्रेमधलं औषध नाकाद्वारे शरीरात जातं. शरीरात पोहोचताच ते रक्तात मिसळतं. त्यामुळे अगदी पाच ते पंधरा मिनिटांत त्याचे परिणाम दिसू लागतात. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा नवीन नेझल स्प्रे पचनसंस्थेला बायपास करून थेट रक्तात मिसळतो आणि लगेच परिणाम दर्शवू लागतो. त्यामुळेच तो तोंडाद्वारे घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांच्या तुलनेत जास्त परिणामकारक आहे. कॅलिफोर्नियामध्ये या स्प्रेच्या प्राथमिक ट्रायल्स घेण्यात आल्या असून त्याचे रिझल्ट आश्चर्यकारक आहेत. सुरुवातीच्या ट्रायलनंतर आता ऑस्ट्रेलियात या स्प्रेच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या सुरू आहेत.

    रॉयल ऑस्ट्रेलियन कॉलेजच्या म्हणण्यानुसार, पुरुषांमधली इरेक्टाइल डिस्फंक्शन ही समस्या सर्वसामान्य आहे. या समस्येचा प्रतिकूल परिणाम लैंगिक संबंध आणि आरोग्यावर होत आहे. संशोधकांच्या मते इरेक्टाइल डिस्फंक्शन होण्यामागे अनेक कारणं आहेत. हृदयविकार, तणाव, अस्वस्थतेमुळे भावनांवर परिणाम झाल्याने पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमधला रक्तप्रवाह कमी होतो. याला इरेक्टाइल डिस्फंक्शन म्हणतात. व्हायग्रा प्रायव्हेट पार्टमधला रक्तप्रवाह वाढवण्याचे काम करतो. व्हायग्रा घेतल्यानंतर ते शरीरात पूर्णतः शोषलं गेल्यानंतर म्हणजेच 30 मिनिटं ते 1 तासानंतर त्याचा परिणाम दिसू लागतो.

    'या' ठिकाणी महिला, आई होणं तर सोडाच लग्नालाही देत आहेत नकार! हे आहे कारण

    'डेली मेल'च्या वृत्तानुसार, 1990च्या दशकापासून व्हायग्राचा वापर वेगानं वाढत आहे; पण यात काही त्रुटी आहेत. याचा परिणाम सुमारे एक तासानंतर दिसू लागतो. नवीन नेझल स्प्रे व्हायग्राच्या तुलनेत खूप लवकर परिणामकारक ठरतो. स्प्रेचा परिणाम पाच मिनिटांत दिसू लागतो. इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या दूर होण्यात हा स्प्रे महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियात या स्प्रेची मोठ्या प्रमाणावर चाचणी सुरू आहे. चाचणीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाची यासाठी मंजुरी घेतली जाईल आणि 2025पर्यंत हा नेझल स्प्रे मार्केटमध्ये दाखल होईल.

    First published:
    top videos

      Tags: Health, Health Tips, Lifestyle