मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सौंदर्य नव्हे तर महिलांच्या 'या' गोष्टीकडे आकर्षित होतात पुरुष; सर्वेक्षणात उलगडली 'राज की बात'

सौंदर्य नव्हे तर महिलांच्या 'या' गोष्टीकडे आकर्षित होतात पुरुष; सर्वेक्षणात उलगडली 'राज की बात'

पुरुषांना सुंदर, गोऱ्या महिला आवडतात असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही.

पुरुषांना सुंदर, गोऱ्या महिला आवडतात असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही.

पुरुषांना सुंदर, गोऱ्या महिला आवडतात असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही.

मुंबई, 26 ऑक्टोबर :  सामान्यपणे पुरुषांना सुंदर, सडपातळ, गोऱ्या महिला आवडतात असंच सर्वांना वाटतं (Attraction). पण खरंतर पुरुष महिलांच्या सौंदर्याकडे नाही तर वेगळ्याच गोष्टीकडे आकर्षित होतात. वेगवेगळ्या वयोगटातील पुरुषांना महिलांकडून काही खास अपेक्षा असतात आणि अशाच महिला त्यांना आवडतात (Men like woman).

एका विशिष्ट वयानंतर महिला आणि पुरुषांमध्ये मानसिक, भावनिक, वैचारिक तसंच शारीरिक बदल होत असतात. वाढत्या वयानुसार प्रगल्भता (Maturity) वाढत जाते. त्यामुळे केवळ दिसणं हा आकर्षणासाठी निकष राहत नाही. त्यामुळे वयपरत्वे पुरुषदेखील महिलांप्रमाणे प्रेम, विश्वास आणि सुरक्षेचा अधिक विचार करतात. एका विशिष्ट वयानंतर पुरुषांचं महिलांकडं आकर्षित होण्याचा दृष्टिकोन निश्चितच बदललेला असतो. पुरुष नेमक्या कोणत्या महिलांकडं अधिक आकर्षित होतात, याविषयी एक सर्व्हे (Relationship Survey) करण्यात आला. टाइम्स ऑफ इंडियाने हा सर्व्हे केला. या सर्व्हेतून काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या.

चाळीशीच्या आसपासचे पुरुष ज्या महिलेमुळे अधिक सुरक्षित (Secure) वाटतं, जी आपलं दुःख वाटून घेऊ शकते, आपली अधिक काळजी घेऊ शकते, अशा महिलांकडं आकर्षित होतात.

हे वाचा  - प्रेमभंग झाल्यावरही येतो हृदयविकाराचा झटका? संशोधनातून समोर आल्या या बाबी

तसेच एका ठराविक वयानंतर पुरुष चंचल मनोवृत्तीच्या महिलांकडं अधिक आकर्षित होतात. अशा पुरुषांना खूप जास्त आनंदी राहणाऱ्या, सभोवतालचं वातावरण आनंददायी करणाऱ्या महिला अधिक आवडतात. या महिलांशी नातं जोडल्यास आनंद आणि नातेसंबंधात योग्य संतुलन (Balance) तयार होईल अशी कल्पना एक विशिष्ट वय ओलांडलेल्या पुरूषांची असते.

काही पुरुषांना अशा महिला आवडतात की ज्या रहस्यमय आणि वेधक असतात. जी महिला स्वतःविषयी फारसं बोलत नाही, परंतु, समोरील व्यक्तीनं आपल्यावर प्रेम करावं असं तिला वाटतं, अशा महिला पुरुषांना अधिक आकर्षित करतात.

हे वाचा  - हे खरं 'बचपन का प्यार'! 60 व्य वर्षी मिळालं पहिलं प्रेम; 40 वर्षांनी जुळलं लग्न

ज्या महिला मुलाबाळांवर (Children) विशेष प्रेम करतात, त्यांच्यासोबत भरपूर वेळ घालवू इच्छितात अशा महिला खूप काळजी घेणाऱ्या आणि सपोर्ट करणाऱ्या असतात, असा पुरुषांचा समज असतो, त्यामुळे ते अशा महिलांकडं अधिक आकर्षित होतात.

काही पुरुषांना त्यांच्यापेक्षा वयानं लहान असलेल्या महिलांसोबत डेट करणं विशेष आवडतं. यामुळे त्यांना त्यांचे तरुणपण जिवंत ठेवता येतं, तसेच नव्या पिढीशी, त्यांच्या विचारांशी जोडता येतं, असं या सर्व्हेमधून स्पष्ट झालं आहे.

First published:

Tags: Lifestyle, Relationship