मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /मास्क की फेस शिल्ड; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी काय वापरणं योग्य?

मास्क की फेस शिल्ड; कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी काय वापरणं योग्य?

कोरोनापासून बचावासाठी काहींच्या चेहऱ्यावर मास्क, तर काहींच्या चेहऱ्यावर फेस शिल्ड आहेत. मात्र या दोघांपैकी सर्वात जास्त सुरक्षित काय आहे ते जाणून घेऊ.

कोरोनापासून बचावासाठी काहींच्या चेहऱ्यावर मास्क, तर काहींच्या चेहऱ्यावर फेस शिल्ड आहेत. मात्र या दोघांपैकी सर्वात जास्त सुरक्षित काय आहे ते जाणून घेऊ.

कोरोनापासून बचावासाठी काहींच्या चेहऱ्यावर मास्क, तर काहींच्या चेहऱ्यावर फेस शिल्ड आहेत. मात्र या दोघांपैकी सर्वात जास्त सुरक्षित काय आहे ते जाणून घेऊ.

 • myupchar
 • Last Updated :

  कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी लॉकडाऊन कायम ठेवणं, देशाच्या अर्थव्यवस्थेला परवडणारं नाही. त्यामुळे आता असं म्हटलं जातं आहे की कोरोनाशी लढतानाच आपल्याला अर्थव्यवस्थेला चालना द्यायला हवी. येणाऱ्या दिवसात कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क घालणे, हात स्वच्छ राखणे या पर्यायांचा वापर आपल्याला करायला हवा.

  myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. अजय मोहन म्हणाले, जोपर्यंत कोरोनावर प्रभावी उपचार मिळत नाही तोपर्यंत सावधानता बाळगणे हाच एकमात्र उपाय आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी अनेक डॉक्टर फेस शिल्डचा उपयोग करतात. बाजारातही फेस शिल्ड उपलब्ध आहेत, त्यामुळे अनेक लोक फेस शिल्ड वापरायला लागले आहेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, पूर्ण चेहरा झाकल्याने डोळ्यांच्या माध्यमातून संक्रमणाचा धोका राहत नाही. चला तर जाणून घेऊ फक्त मास्कचा उपयोग करून सुरक्षित राहता येते की फेस शिल्ड जास्त सुरक्षित आहे.

  फेस शिल्डचा उपयोग होईल का?

  जेव्हापासून लॉकडाऊन हळूहळू शिथील होऊ लागला अनेक जण फेस शिल्ड घालून फिरताना दिसतात. त्यातल्या त्यात डॉक्टर आणि केमिस्ट फेस शिल्डचा उपयोग करताना आढळून येतात. जे फेस शिल्डचा उपयोग करतात, ते मास्क वापरणाऱ्या लोकांपेक्षा जास्त सुरक्षित असतात. तज्ज्ञांच्या मते लोकांना ही गोष्ट लक्षात येईल की फेस शिल्ड जास्त सुरक्षित आहे आणि ते लवकरच फेस शिल्डचा वापर करू लागतील. फेस शिल्डमुळे पूर्ण चेहरा झाकला जातो. त्यामुळे विषाणूचा संपर्क होण्यापासून ते वाचू शकतात.

  फेस शिल्ड सोयीचे आहे

  फेस शिल्डची जर मास्कशी तुलना केली तर फेसशिल्ड जास्त सुरक्षित आहे. याशिवाय फेस शिल्ड मास्कपेक्षा अधिक सोयीचे आहे. कारण मास्क वारंवार नाकावरून घसरून जाते, त्यामुळे त्याला व्यवस्थित करण्यासाठी तोंडाला पुन्हा पुन्हा हात लावावा लागतो. त्याने संसर्गाचा धोका वाढतो. मास्क घातल्याने तोंडाला खाज येते आणि थोड्या वेळातच श्वास घ्यायला देखील त्रास होतो. पण फेस शिल्ड घातल्याने अशी समस्या निर्माण होत नाही आणि ते सोयीचं मानलं जातं.

  फेस शिल्डविषयी करण्यात आलेला अभ्यास

  फेस शिल्डवर करण्यात आलेल्या एका अभ्यासात एक गोष्ट समोर आली ती म्हणजे, जर कोणी तुमच्या आसपास शिंकलं किंवा खोकलं फेस शिल्ड 96 टक्के सुरक्षितता देते. फेस शिल्ड वापरलं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळायची गरज नाही असं नाही. फेस शिल्ड कितीही सुरक्षित असलं तरी, काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. अजय मोहन यांच्यानुसार, जर तुमच्या आसपास कोणी शिंकलं किंवा कुणाला खोकला आला तर तर त्याच्या तोंडावाटे उडालेले शिंतोडे काही काळ हवेत असतात. त्यामुळे फेस शिल्ड सोबत इतरही काळजी आपल्याला घ्यायला हवी.

  लहान मुलांना फेस शिल्ड लावणं चांगलं

  फेस शिल्ड लावणं लहान मुलांसाठी सोयीचं आहे. त्याने मुलांना जास्त बरं वाटतं. काही मुलांना मास्क घातला तर ते चिडचिड करतात आणि काही वेळाने मास्क काढून टाकतात. अशा परिस्थितीत संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो. मास्कच्या तुलनेत फेस शिल्डमुळे मुलांना गुदमरणं किंवा श्वास घ्यायला त्रास होण्याचा धोका होत नाही. जर मास्कसोबत फेस शिल्ड लावली तर ते अधिक चांगले. संसर्गापासून पूर्ण संरक्षण मिळते.

  अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - छातीत संसर्ग

  न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

  First published:

  Tags: Coronavirus, Mask