मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

रोज काळ्या मनुका खाल्ल्याने पोटाच्या समस्या होतील दूर; `या` आजारांचा धोका होईल कमी

रोज काळ्या मनुका खाल्ल्याने पोटाच्या समस्या होतील दूर; `या` आजारांचा धोका होईल कमी

Black Raisins benefits

Black Raisins benefits

रोज मनुका खाणं लाभदायक ठरतं. मनुका खाल्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात. तुम्ही पोटाच्या आरोग्यासाठी रोज रिकाम्यापोटी काळ्या मनुकांचं पाणी पिऊ शकता. याशिवाय काळ्या मनुका सेवन करण्याचे आणखी खूप फायदे आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 25 नोव्हेंबर :जीवनशैली आणि त्यामुळे आहारात बदल होत असल्याने अनेक गंभीर आजार होण्याचा धोका वाढला आहे. कोणत्याही स्वरूपाचा गंभीर आजार होऊ नये, यासाठी पोषक आहार आणि पुरेसा व्यायाम गरजेचा आहे. सर्वसाधारणपणे आपण शरीराला पुरेशा प्रमाणात पोषक तत्त्व मिळावी यासाठी ड्रायफ्रुट्सचं सेवन करतो. बदाम, काजू, सुकं अंजीर, पिस्ता यासारखे पदार्थ आरोग्यासाठी पूरक मानले जातात. ड्रायफ्रुट्समधल्या काळ्या मनुका यादेखील आरोग्यासाठी हितावह असतात. रोज मनुका खाणं लाभदायक ठरतं. मनुका खाल्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात. तुम्ही पोटाच्या आरोग्यासाठी रोज रिकाम्यापोटी काळ्या मनुकांचं पाणी पिऊ शकता. याशिवाय काळ्या मनुका सेवन करण्याचे आणखी खूप फायदे आहेत. याविषयीची माहिती `आज तक`ने दिली आहे.

काळ्या मनुका आरोग्यासाठी उत्तम असतात. या मनुकांमध्ये फायबर मुबलक असतं. यामुळे पोटात गॅस होणं, सूज येणं, पोट फुगणं, बद्धकोष्ठता, अपचनासारख्या समस्या दूर होतात. मेटाबॉलिझम अर्थात चयापचय क्रिया चांगली राहते. आतड्यातील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते आणि शरीर डिटॉक्सिफाय करण्यासाठी काळ्या मनुका उपयुक्त ठरतात. त्यामुळे रोज काळ्या मनुका खाणं गरजेचं आहे.

हेही वाचा - ही व्हिटॅमिन कमी पडत असतील तर चेहरा कमी वयातच वयस्क दिसू लागतो

आरोग्यासाठी आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी काळ्या मनुकांचं पाणीदेखील रोज पिऊ शकता. या पाण्यामुळे पोट साफ राहतं. मल पातळ होऊन बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. काळ्या मनुकांच्या पाण्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. काळ्या मनुकांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. काळ्या मनुकांचं पाणी शरीराला थंडावा देणारं असतं. यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास दूर होतो. यात अँटिइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे काळ्या मनुका खाल्ल्यास आतड्यांचे काम उत्तम रितीने चालण्यास मदत होते.

काळ्या मनुकांचं पाणी तयार करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्ही रात्री एका कपभर पाण्यात चार ते पाच मनुका टाकून ते पाणी उकळून घ्यावं. त्यानंतर या पाण्यात काळ्या मनुका रात्रभर भिजत ठेवाव्यात. सकाळी हे पाणी गाळून घ्यावं आणि काळ्या मनुका बाजूला काढव्यात. हे पाणी सकाळी रिकाम्यापोटी प्यावं. त्यानंतर तुम्ही गरजेनुसार भिजलेल्या काळ्या मनुका खाऊ शकता.

काळ्या मनुकांमध्ये मुबलक प्रमाणात फेनोलिक कंपाउंड असतं. याशिवाय काळ्या मनुका म्हणजे रेझवेराट्रोल, फ्लेव्होनॉइड्स, प्रोसायनिडिन आणि अँथोसायनिनसारख्या नैसर्गिक रासायनिक संयुगांचं भांडार आहे. यामुळे डायबेटिस, अल्झायमर, हृदय आणि पोटाच्या आजारांचा धोका कमी होतो. त्यामुळे रात्री काळ्या मनुका पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्यापोटी हे पाणी प्यायलं तर आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतं.

First published:

Tags: Health Tips