वॉशिंग्टन, 10 मे : सध्या कोरोनाव्हायरस (Coronavirus) सर्वत्र थैमान घालतो आहे. कोरोना महासाथीतून अद्याप सुटका झाली नाही तोवर आणखी काही व्हायरस समोर येत आहेत. अशाच एका खतरनाक व्हायरसचं प्रकरण समोर आलं आहे. एका छोट्याशा कीटकामुळे एका व्यक्तीला या व्हायरसची लागण झाली आहे. हा व्हायरस थेट मेंदूत घुसला आहे (Tick bite cause brain virus infection). ज्यामुळे या व्यक्तीला दुर्मिळ असं व्हायरस मेंदूचं व्हायरस इन्फेक्शन झालं आहे (American man rare brain virus).
अमेरिकेतील 50 वर्षांच्या या व्यक्तीला गंभीर आजारामुळे मार्चमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीत त्याच्या मेंदू आणि नर्व्हस सिस्टमवर दुर्मिळ पॉवासन व्हायरसने (Powassan virus) हल्ला केल्याचं निदान झालं. चिंताजनक म्हणजे या व्हायरसवर अद्याप कोणतंच औषध तयार झालेलं नाही. माहितीनुसार हे प्रकरण समोर येण्याआधी अमेरिकेच्या मेन राज्यात याच व्हायरसमुळे एका व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे.
हे वाचा - Alert! Coronavirus नंतर आता Monkeypox virus चं संकट! या लक्षणांकडे दुर्लक्ष पडेल महागात
या व्हायरसचा संसर्ग टिक (गोचिडसारखा कीटक) किंवा वुडचक (अमेरिकेत आढळणारी एक घूस) चावल्याने होतो. कुत्रे किंवा इतर प्राण्यांच्या शरीरावर टिक असतात. या व्यक्तीला टिक चावला होता हे स्पष्ट झालं आहे. डिपार्टमेंट ऑफ पब्लिश हेल्थच्या कमिनशनर डॉक्टर मनीषा जुठानी यांनी सांगितलं की, कनेक्टिकटमध्ये राहणाऱ्या पॉवासन व्हायरसने संक्रमित असलेल्या या रुग्णाला टिक चावल्याची माहिती मिळाली आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार कनेक्टिकट डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ (Connecticut Department of Public Health) सांगितलं की, अद्याप या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होतो आहे. या इन्फेक्शनवर अद्याप औषध नाही. त्यामुळे ही व्यक्ती ठिक होणं कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही. असं डॉ. जुठानी म्हणाल्या.
हे वाचा - Shocking! Deodorant मुळे मुलीचा मृत्यू; वास घेताच गेला जीव
त्यामुळे लोकांनी हा कीटक आपल्या घरात येणार नाही, याची काळजी घ्यावी. अशा कीटकाला दूर ठेवणारे स्प्रेचा वापर करा, असा सल्लाही डॉ. जुठानी यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Rare disease, Serious diseases, Virus