मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /खुशखबर! कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगबाबत मिळणार ही मोठी सवलत

खुशखबर! कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगबाबत मिळणार ही मोठी सवलत

फास्टॅग ही नागरिकांचा रस्ते वाहतुकीचा अनुभव सुलभ व्हावा यासाठी राबवलेली योजना आहे. या योजनेबाबत अजून एक गुड न्युज कळते आहे.

फास्टॅग ही नागरिकांचा रस्ते वाहतुकीचा अनुभव सुलभ व्हावा यासाठी राबवलेली योजना आहे. या योजनेबाबत अजून एक गुड न्युज कळते आहे.

फास्टॅग ही नागरिकांचा रस्ते वाहतुकीचा अनुभव सुलभ व्हावा यासाठी राबवलेली योजना आहे. या योजनेबाबत अजून एक गुड न्युज कळते आहे.

मुंबई, 8  जानेवारी : जफास्टॅग (fastag) प्रणालीचा वाहनधारकांनी अधिकाधिक वापर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या वर्षाच्या सुरवातीलाच ही सुखावणारी बातमी नागरिकांना मिळते आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) पथकर नाक्यांवर फास्टॅगधारक वाहनांना 5 टक्के सवलत (cashback) ) मिळणार आहे. ही सवलत 11 जानेवारी 2021 पासून लागू होणार असल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी कळवले आहे.

पथकर नाक्यावरुन जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस (cashless) व वेगवान होण्यासाठी फास्टॅग प्रणाली विकसित करण्यात आली आहे. फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहनधारकांसाठी प्रोत्साहनपर कॅशबॅक योजना जाहीर केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना सह-व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे म्हणाले, “मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व वांद्रे-वरळी सागरी सेतूने प्रवास करणाऱ्या प्रत्येक फेरीला पथकराच्या 5 टक्के कॅशबॅक रक्कम वाहनधारकाच्या फास्टॅग बँक खात्यात महामंडळामार्फत थेट जमा होईल. फास्टॅगचा वापर वाढावा, या हेतूने महामंडळाने कार, जीप व एसयूव्ही वाहनधारकांकरता मर्यादित कालावधीसाठी सवलत योजना लागू केली आहे,”

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने राज्यभरातील पथकर नाक्यांवर फास्टॅग प्रणालीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यातर्गंत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग, राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) तसेच मुंबई एन्ट्री पॉईंटतर्गंत वाशी (Vashi) , मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), मुलुंड (लाल बहाद्दूर शास्त्री), ऐरोली पथकर नाक्यावर फास्टॅग प्रणाली कार्यान्वित झाली आहे. फास्टॅग प्रणालीची 100 टक्के अंमलबजावणीच्या दृष्टीने महामंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

फास्टॅगधारक वाहनांच्या संख्येत वाढ होण्यासाठी वांद्रे-वरळी सागरी सेतू पथकर नाका व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर, तळेगाव पथकर नाका, फूड मॉल, पेट्रोल पंपावर (petrol pump) वेगवेगळ्या  बँकांच्या मदतीने फास्टॅग स्टॉल सुरु करण्यात आले आहेत. त्याबरोबरीने रेडिओ एफएम वाहिनीवर प्रसिद्धी मोहीम देखील राबवण्यात येत असल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

First published: