गेल्या 24 तासांत कल्याण डोंबिवली हद्दीत (KDMC lockdown news) रुग्णसंख्या दुपटीने वाढली. त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेत कल्याण डोंबिवली महापालिकेने कडक निर्बंध घालायचा निर्णय घेतला आहे.
दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरु राहतील. शनिवार आणि रविवारी दुकाने पी-1 आणि पी-2 यानुसार खुली ठेवता येतील.
लग्न सभारंभ सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेतच आयोजित करावेत. महापालिका प्रभाग क्षेत्र कार्यालय आणि पोलिसांच्या परवानगीनुसार सर्व नियमांचं पालन करण्याच्या अटीवर होतील.
जीम, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदानं, गार्डन्स इत्यादी वैयक्तिक सरावासाठी सुरू राहतील. सामूहिक, स्पर्धा किंवा कार्यक्रमांना परवानगी नाही.
गुरुवारपासूनच नवे अधिक कडक निर्बंध (New covid restrictions in kalyan dombivali) लागू करायचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्बंधांचं पालन न करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दुकानदार, पेट्रोलपंप माल आणि कर्मचारी, फेरीवाले, शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस चालकांनाही आरटी-पीसीआर टेस्ट बंधनकारक असेल.