Home /News /lifestyle /

GOOD NEWS: iPhone घ्यायचाय? थोडं थांबा, Amazon वर मिळू शकतं जबरदस्त डील

GOOD NEWS: iPhone घ्यायचाय? थोडं थांबा, Amazon वर मिळू शकतं जबरदस्त डील

स्मार्टफोन विशेषतः iPhone घ्यायचा विचार करत असाल तर आनंदाची बातमी आहे. लवकरच सुरू होणाऱ्या Amazonच्या फेस्टिवल सिझन सेलमध्ये लेटेस्ट आयफोन 50 हजारांच्या आत मिळण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 08 ऑक्टोबर: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आयफोन (Iphone) घ्यायचं स्वप्न भंगलं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Amazon festive sale 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या सेलमध्ये आयफोन 11 तुम्हाला 50 हजार रुपयांहून कमी किंमतीत मिळणार आहे. अमेझॉनच्या फेस्टिवल सिझन सेलच्या टीझरममध्ये ही गुडन्यूज सांगण्यात आली आहे. फेस्टिवल सीझनमुळे या फोनची किंमत कमी झाली आहे. या टीझरमध्ये आयफोन 11 ची नेमकी किंमत सांगण्यात आलेली नाही. परंतु "अँपलचा सगळ्यात जबरदस्त फोन आता कमी किंमतीत" अशी घोषणा या टीझरमधून करण्यात आली आहे. आयफोन 1164GB आता फक्त 4,999 रुपयांमध्ये Amazonच्या वेबसाइटवर मिळणार आहे. यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की, 64GB आता 50,000 रुपयांहून कमी किंमतीत मिळू शकतो. भारतात सध्या आयफोन 11 ची किंमत 68,300 रुपये आहे. त्यामुळे ज्यांना आयफोन 11 विकत घ्यायची इच्छा आहे, त्यांना आता Amazon दी ग्रेट इंडियन सेल (Amazon The Great Indian Sale) नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. त्याशिवाय डेबिट आणि क्रेडिट कार्डवरसुद्धा  इन्स्टंट कॅशबॅक ऑफर मिळू शकतात. आयफोन 11 ला 6.1 इंचाचे लिक्विड रेटिना LCD पॅनल देण्यात आले आहे. डॉल्बी साउंडसोबत Spatial सुद्धा या फोनमध्ये आहे. स्मार्टफोनमधील सगळ्यात फास्ट प्रोसेसर ज्याला A13 Bionic चीप मधून पॉवर मिळते ते सुद्धा या फोनमध्ये  देण्यात आले आहेत. अँपलने अधिकृतपणे अजूनतरी रॅम आणि बॅटरी संदर्भात कोणताही खुलासा केलेला नसला तरी  रिपोर्टनुसार या फोनमध्ये 4 GB रॅम आणि 3,190mAh बॅटरी असणार आहे.वाइड आणि अल्ट्रा वाइड शॉट घेण्यासाठी दोन 12 मेगापिक्सलचे कॅमेरे या फोनमध्ये देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी फेसआयडी सोबत 12 मेगापिक्सलचा TrueDepth फ्रंट कॅमेरा या फोनमध्ये असेल.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Iphone, Sale

    पुढील बातम्या