थकवा - तुम्ही योग्य आहार घेत आहात, पुरेशी झोप घेत आहात, तरीदेखील तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर तुमच्या शरीरात 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता असू शकते.
हाडं आणि स्नायूंमध्ये वेदना - 'व्हिटॅमिन डी' हाडं आणि स्नायूंसाठी आवश्यक असतं, त्यामुळे जर तुमची हाडं आणि स्नायूंमध्ये वेदना होत असतील तर हे 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेचं लक्षण असू शकतं.
जखम उशिराने भरणं - तुम्हाला जखम झाली आणि ती बरी होण्यास खूप वेळ लागत असेल, तर हे व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं.
मूडमध्ये बदल - महिलांमध्ये 'व्हिटॅमिन डी'चा अभाव असेल, तर त्यामुळे तणाव उद्भवतो. महिलांच्या मूडमध्ये बदल होत राहतो, त्यांच्यामध्ये उदासीनता, निराशा येते.
केस गळणं - केस गळण्यावर तुम्ही भरपूर उपचार केलेत, मात्र फरक पडत नाही. तुमचे केस भरपूर प्रमाणात गळत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हेदेखील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचं एक लक्षण आहे.