नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : पाठदुखी (Back pain) ही एक अतिशय सामान्य समस्या आहे आणि जवळजवळ प्रत्येकालाच ही समस्या कधी ना कधी त्रास देते. बहुतेक लोक एक सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र, असं करणं भविष्यात खूप जड जाऊ शकतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लोकांना अजूनही पाठदुखी आणि त्यामुळे होणाऱ्या गंभीर धोक्यांविषयी फारशी माहिती नाही.
समस्या कधी सुरू होते
आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, पाठदुखीची समस्या सहसा वयात आल्यानंतर किंवा 20 वर्षांच्या आसपास सुरू होते. परंतु, त्याचे नेमके कारण शोधण्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात. त्यावर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर, ते पाठीच्या पेशींचंही नुकसान करू शकतं. एवढंच नाही तर, यामुळं दैनंदिन कामकाज करण्यातही अडचण येत आहे. पाठदुखीमुळं मोजे घालणंही कठीण होऊ शकतं. काही गंभीर प्रकरणांमध्ये यामुळं शरीरात नवीन हाडाची निर्मितीही होऊ शकते.
पाठदुखीकडं दुर्लक्ष करण्यानं होणारे तोटे
पाठदुखीविषयी बहुतांश लोकांना वाटतं की, ही सांधेदुखीची किंवा त्यासारखी समस्या असू शकते. परंतु आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हे यापेक्षा बरंच गंभीर असू शकतं. पाठदुखीवर उपचार करण्याऐवजी रुग्ण वेदना कमी करण्याचे मार्ग शोधतात. सतत पाठदुखी केवळ पेशी आणि हाडांना हानी पोहोचवत नाही तर मानसिक आरोग्यावरही परिणाम करते.
हा आजार असू शकतो
पाठीच्या सांध्यातील वेदनांमुळे, पाठीच्या खालच्या आणि कटिप्रदेशात वेदना होतात. डॉक्टर म्हणतात की, हे सायटिकाचं (Sciatica) दुखणंदेखील असू शकतं. बऱ्याचदा लोकांना या आजारावर उपचार नाहीत, हे समजत नाही. या व्यतिरिक्त, हे Axial spondyloarthritis चं लक्षण देखील असू शकते. या स्थितीत, वेदना सांध्यापासून सुरू होते आणि नितंबांपर्यंत पोहोचते. बऱ्याचदा लोकांना या दोन आजारांमधी फरक लक्षात येत नाही. डॉक्टरांच्या मते, अॅक्सियल स्पॉन्डिलोआर्थराइटिस सुरुवातीला सापडत नाही आणि तो शोधण्यासाठी एक्स-रे करावा लागतो.
हे वाचा - आपला ‘आजार’ पाहून हादरली तरुणी, डॉक्टरविरोधातच केली तक्रार; नेमकं काय आहे प्रकरण पाहा
अॅक्सियल स्पॉन्डिलोआर्थराइटिसची सुरुवातीची लक्षणं क्ष-किरणांमध्ये (X-Ray) दिसत नाहीत. आजार गंभीर टप्प्यावर येईपर्यंत हे समजत नाही. याच कारणानं डॉक्टरही या रोगाबद्दल निदान करण्यासाठी बराच वेळ घेतात. याचं निदान करण्यासाठी एमआरआय किंवा रक्त तपासणीदेखील केली जाऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips