Love Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल

Love Story : आईनं आरडींना सांगितलं होतं, आशाशी लग्न केलंस तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल

बाॅलिवूडची एक सुंदर आणि सुरेल लव्हस्टोरी. आशा भोसले आणि आर.डी बर्मन. सुंदर सुरांच्या मागे अनेक संघर्षही होते.

  • Share this:

मुंबई, 16 फेब्रुवारी : बाॅलिवूडची एक सुंदर आणि सुरेल लव्हस्टोरी. संगीतकार आर.डी.बर्मन आपल्या आईजवळ गेले. तिला नमस्कार करून लग्नाची परवानगी मागितली. आई भडकली, म्हणाली हे लग्न करायचं असेल तर तुला माझ्या शवावरून जावं लागेल.

आज्ञाधारक पंचम उदास होऊन परतले. लग्नाची सर्व तयारी वाया गेली. मग खूप वर्षांनंतर पंचमदा आणि आशा भोसले यांनी लग्न केलं, तेव्हा पंचमदांची आई होती. पण त्यांची अवस्था खूपच वाईट होती. ती कुणाला ओळखत नव्हती.

आशाताई आणि पंचमदा म्हणजे दोन सुरांचा संगम. दोघांमध्ये खूप फरक. दोघं वेगळे, वयात अंतरही. पण तरीही दोघं एकमेकांसाठीच जणू बनलेले.

पहिली भेट

1956 ते 23च्या काळात आशा भोसले आणि आरडी बर्मन भेटले. दोघांचं बाॅलिवूडमध्ये वेगळं स्थान होतं. आरडी सचिन देव बर्मन यांचे पुत्र. दहा वर्षांनंतर आशाताई आणि पंचमदा यांनी मिळून काम केलं त्या सिनेमाचं नाव होतं तिसरी मंजिल. तिथपासून दोघांच्या रोमँटिक पार्टनरशिपची सुरुवात झाली. आरडींनी संगीतात वेगवेगळे प्रयोग केले तर आशाताईंच्या आवाजात वेगळीच नशा होती.

दु:खाचा काळ

दोघांनी आयुष्यातले बरेच चढउतार पाहिले होते. आशाताई 16 वर्षाच्या असताना घरच्यांच्या मनाविरुद्ध 31 वर्षांच्या गणपतराव भोसलेंशी लग्न केलं. पती आणि सासरच्यांनी त्यांना खूप छळलं. मग एक दिवस असा उजाडला की आशाताई आपले दोन मुलगे आणि एक मुलगी यांना घेऊन आपल्या बहिणीकडे आल्या. तेव्हा त्या गरोदर होत्या. त्यांनी तिसरा मुलगा झाला होता.

आरडींच्या आयुष्यातही चढउतार

आरडींचा अगोदर रिता पटेलशी 1966मध्ये प्रेमविवाह झाला होता. तो जेमतेम 5 वर्ष टिकला. रिताची भेट दार्जिलिंगला झाली होती. नंतर दोघांनी लग्न केलं. पण नात्यात इतकी कटुता आली की पंचमदा घर सोडून हाॅटेलमध्ये राहू लागले.

रोमान्स आणि संगीताचा अनोखा मिलाफ

आशाताई आरडींची गाणी गात होत्या. आरडींचं संगीत आणि आशाताईंचा आवाज... अद्वितीय असा सूरसंगम. जणू दोघं एकमेकांसाठीच बनलेत.

प्रेमात होत्या अनंत अडचणी

दोघं जवळ येत होते. पण अनेक अडचणी होत्या. आशाताईंचं वय जास्त होतं. त्यांच्या सोबत त्यांचं कुटुंब होतं. आरडींची आई लग्नाच्या पूर्ण विरोधात. सगळं त्यांनी काळावर सोडलेलं. पण एकमेकांची साथ सोडली नाही.

या परिस्थितीत केलं लग्न

आरडींचे वडील सचिनदेव यांचं लग्न झालं. त्यावेळी आरडींची आई मीराला मोठा धक्का बसला. त्यांची स्मृती गेली. या परिस्थितीत आरडींनी 1980मध्ये आशाताईंशी लग्न केलं.

14 वर्षांचं प्रेमाचं बंधन

दोघांनी लग्न केलं. ते 14 वर्ष अगदी स्वप्नवत होते. संंगीताबरोबर दोघांना जेवण बनवायला आवडायचं. ते आपल्या मित्रमैत्रिणींना बोलावून जेऊ घालायचे. सगळे अक्षरश: बोटं चाटायचे. कोण चांगलं जेवण बनवणार याची दोघांमध्ये पैजही लागायची.

वयाच्या 54व्या वर्षी आरडींचं निधन झालं. आशाताई पूर्ण कोलमडून गेल्या. पण शेवटी काळ चांगलं औषध असतं. त्या सावरल्या. पण अख्खं आयुष्य त्यांनी पंचमदांना समर्पित केलं. पंचमदांना आशाताई बब्स म्हणायच्या.

First published: February 16, 2019, 6:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading