जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 'ही' आहेत 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेची लक्षणं

'ही' आहेत 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेची लक्षणं

'ही' आहेत 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेची लक्षणं

'ही' आहेत 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेची लक्षणं

कधीकधी आपल्या लक्षात येत नाही की आपल्याला नक्की काय होतं आहे, त्यामुळे खालील काही लक्षणं तुम्हाला व्हिटॅमिन डीची कमतरता आहे की नाही हे सांगण्यास मदत करतील.

  • -MIN READ
  • Last Updated :

    07 डिसेंबर : आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी खूप महत्त्वाचं आहे. व्हिटॅमिन डीच्या मदतीने शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढते. शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता भासल्यास हाडांना त्रास होतो त्याचबरोबर मधुमेह, हायपरटेंशन वाढतं. पण कधीकधी आपल्या लक्षात येत नाही की आपल्याला नक्की काय होतं आहे, त्यामुळे खालील काही लक्षणं तुम्हाला व्हिटॅमिन डीची कमतरता आहे की नाही हे सांगण्यास मदत करतील. - हायपरटेंशन व्हिटॅमिन डीची कमी असल्यास हायपरटेंशन किंवा उच्च रक्तदाब जाणवतो. - स्नायू आणि शरीरावर तणाव आपल्या शरीरात अचानक वेदना वाढल्या, स्नायूंमध्ये कडकपणा आला की आपल्याला तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. - डिप्रेशन व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, निराशा आवश्यकतेपेक्षा अधिक वाढते. आपण क्षुल्लक गोष्टींचा विचार करायला लागतो आणि त्याने आपल्याला मानसिक त्रास होतो. - अस्वस्थता तुम्ही जर सारखे अस्वस्थ होत असाल किंवा तुम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरत असाल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. - रोगप्रतिकारक प्रणालीची कमतरता जेव्हा आपलं शरीर लहान-सहान रोगांना पेलू शकत नाही तेव्हा हे लक्षात घ्या की शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. - घाम येणं व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्याला घाम फुटतो. यामुळे आपली चिडचिडही होऊ शकते. अशाच काही कारणांनी तुम्हीही त्रस्त असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यावर उपचार करा. शरीराला पोषक घटक मिळतील अशा पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा आणि निरोगी रहा.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात