मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /LIC ने बंद केल्या ‘या’ पॉलिसी, जर तुमच्याकडे आहेत या पॉलिसी तर जाणून घ्या काय कराल

LIC ने बंद केल्या ‘या’ पॉलिसी, जर तुमच्याकडे आहेत या पॉलिसी तर जाणून घ्या काय कराल

आपलं जीवन सुरक्षित करण्यासाठी LIC आणत आहे एक नवी पॉलिसी. मोठ्या आजारांना सामोरे जाण्यासाठी नवी सुरक्षा देण्यात येत आहे. LIC वेबसाईटच्या माहितीनुसार या पॉलिसीमध्ये तुम्हाला दिवसाला 7 रूपये भरावे लागणार आहेत. याचा वापर तुम्ही कँसर सारख्या मोठ्या अजारांवर मात करू शकता.

आपलं जीवन सुरक्षित करण्यासाठी LIC आणत आहे एक नवी पॉलिसी. मोठ्या आजारांना सामोरे जाण्यासाठी नवी सुरक्षा देण्यात येत आहे. LIC वेबसाईटच्या माहितीनुसार या पॉलिसीमध्ये तुम्हाला दिवसाला 7 रूपये भरावे लागणार आहेत. याचा वापर तुम्ही कँसर सारख्या मोठ्या अजारांवर मात करू शकता.

कंपनीकडून सादर केलेल्या अहवालात सतत व्याज दरात होणाऱ्या घटीमुळे ग्राहकांना चांगले व्याज दर देणे कठीण होत होते

  नवी दिल्ली, १ ऑक्टोबर २०१८- देशाची सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जीवन अक्षय ही पॉलिसी डिसेंबर २०१७ पासून बंद केली आहे. याशिवाय एलआयसीने अजून अनेक पॉलिसी बंद केल्या आहेत. कंपनीकडून सादर केलेल्या अहवालात सतत व्याज दरात होणाऱ्या घटीमुळे ग्राहकांना चांगले व्याज दर देणे कठीण होत होते. म्हणून अखेर त्या पॉलिसी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  एलआयसीने त्यांच्या वेबसाइटवर बंद केलेल्या पॉलिसीबद्दल अधिक माहिती दिली आहे. आज आम्ही तुम्हाला बंद करण्यात आलेल्या पॉलिसींबद्दल अधिक माहिती देणार आहोत. याबद्दल माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला कोणीही चुकीची पॉलिसी विकू शकत नाहीत.

  या पॉलिसी झाल्या बंद- एलआयसीच्या वेबसाइटवर दिल्या गेल्या माहितीनुसार, जीवन सुगम, जीवन वैभव, जीवन वृद्धि, फ़ॉर्च्यून प्लस प्लान, वेल्थ प्लस, मार्केट प्‍लस- I, प्रॉफ़िट प्लस, मनी प्लस- I, चाइल्‍ड फ़ॉर्च्यून प्लस, जीवन साथी प्लस, समृद्धि प्लस, पेंशन प्लस, जीवन निधि, नव जीवन धारा- I, नयी जीवन सुरक्षा- I, हेल्थ प्लस, समूह सुपर एनुएशन प्लस, विमा खाते- १, विमा खाते- २, जीवन मित्र (तिगुनी सुरक्षा), धन वापसी योजना- २५ वर्ष, जीवन मित्र (दुगुनी सुरक्षा), जीवन प्रमुख आजीवन पॉलिसी, आजीवन पॉलिसी- सीमित भुगतान, द्विवर्षीय अस्थायी बीमा पॉलिसी, जीवन अमृत, जीवन सुरभी- २५ वर्ष, जीवन सुरभी- १५ वर्ष, आजीवन पॉलिसी एकल प्रीमियम, जीवन अनुराग, चाइल्ड फ्युचर योजना, चाइल्ड करिअर योजना, जीवन साथी, जीवन श्री- I,

  जीवन अंकुर, बंदोबस्त विमा पॉलिसी (ठराविक रक्कम), विवाह बंदोबस्त किंवा शैक्षणिक, अनमोल जीवन- I, वार्षिकी योजना, जीवन छाया, कोमल जीवन, जीवन किशोर, धन वापसी योजना- २० वर्ष, जीवन तरंग, नवीन विमा गोल्ड, बंदोबस्त विमा पॉलिसी, विमा निवेश २००५, जीवन सरल, जीवन आनंद, विमा बचत, जीवन आधार, जीवन विश्वास, जीवन आनंद, जीवन दीप, जीवन मंगल, जीवन मधुर, इंडोवमेंट प्लस, नई जीवन निधि, अमूल्य जीवन- I, फ्लेक्सी प्लस, जीवन सुरभि- २० वर्ष, जीवन भारती- १, हेल्थ प्रोटेक्शन प्लस, परिवर्तनशील अवधि विमा पॉलिसी, एलआईसीची जीवन शगुन योजना.

  तुमच्याकडे या पॉलिसी आहेत तर काय कराल- तज्ज्ञांच्या मते, जर कोणाकडे आधीपासूनच यापैकी कोणत्या पॉलिसी असतील तर त्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही. पॉलिसीच्या मॅच्युरिटीवेळी पॉलिसी बॉण्डमध्ये दिलेल्या सर्व सुविधा तुम्हाला मिळतील. मात्र गुंतवणूकदारांना एका गोष्टीची खास काळजी घ्यावी लागेल, ती म्हणजे भविष्यात त्यांनी या पॉलिसींपैकी कोणतीही पॉलिसी घेऊ नये. तसे केल्यास कोणतेही पैसे मिळणार नाहीत.

  म्हणून बंद केल्या या पॉलिसी- तज्ज्ञांच्या मते, कोणतीही विमा कंपनी आपल्या पॉलिसी तेव्हा बंद करतात जेव्हा त्यांना त्या पॉलिसीमधून नफा मिळत नाही. गेल्या वर्षी एलआयसीने जीवन अक्षय पॉलिसी बंद करताना म्हटले होते की, त्या पॉलिसीला १० वर्ष सरकारी बॉण्डनुसार ७.०५ टक्के व्याज मिळतं. त्या तुलनेत जास्त व्याज देणं एलआयसीसाठी कठीण होऊन गेलेलं. म्हणून या पॉलिसी बंद करण्याचा निर्णय एलआयसीने घेतला.

  VIDEO: घराला लागलेल्या आगीत 2 लहान मुलांचा होरपळून मृत्यू

  First published:
  top videos

   Tags: Policy plans