जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पावसाळ्यात ब्राँकायटिस धोका; कसा कराल स्वत:चा बचाव

पावसाळ्यात ब्राँकायटिस धोका; कसा कराल स्वत:चा बचाव

पावसाळ्यात ब्राँकायटिस धोका; कसा कराल स्वत:चा बचाव

योग्यवेळी लक्ष दिलं नाही तर ब्राँकायटिस घातक होऊ शकतो.

  • -MIN READ myupchar
  • Last Updated :

    पावसाळ्याच्या दिवसात खूप प्रकारच्या संसर्गाचा धोका असतो. या मोसमात ढगांमुळे हवा प्रदूषित असते. या प्रदूषित हवेत अनेक विषाणू आणि जीवाणू वाढतात. त्यांच्या संपर्काने संसर्ग होण्याचा धोका निर्माण होतो. पावसाळ्यात श्वसनासंबंधित समस्या निर्माण होतात. जसं सर्दी, खोकला, न्यूमोनिया, अॅलर्जी, अस्थमा इत्यादी. त्यातलीच एक समस्या आहे ब्राँकायटिस हा आजार. त्याच्याकडे योग्यवेळी लक्ष दिलं नाही तर तो घातक होऊ शकतो. चला जाणून घेऊया ब्राँकायटिस या आजराविषयी - ब्राँकायटिस म्हणजे काय? myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. नबी वली यांनी सांगितलं, ब्राँकायटिस झालेल्या व्यक्तीच्या श्वासनलिकेत सूज येते. त्यामुळे त्याला खूप खोकला येतो आणि अधिक प्रमाणात कफ पडतो. श्वासनलिका कमजोर होते. कफ अधिक प्रमाणात निर्माण झाल्याने श्वासनलिकेत अवरोध निर्माण होतो आणि फुफ्फुसं खूप प्रमाणात खराब होतात. या रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होतो. ब्राँकायटिसचे प्रकार आणि लक्षणं ब्राँकायटिसचे दोन प्रकार आहेत - एक्युट ब्राँकायटिस आणि क्रॉनिक ब्राँकायटिस. एक्युट ब्राँकायटिसमध्ये साधारण सर्दी आणि ताप येतो. यात कफ झाल्याने छातीत त्रास होतो आणि श्वास घ्यायला पण कठीण होते. एक्युट ब्राँकायटिसमध्ये थोडासा तापही असतो. एक्युट ब्राँकायटिस लहान मुलांना जास्त प्रमाणात होतो. तर क्रॉनिक ब्राँकायटिसमध्ये खोकला आणि कफाचे प्रमाण अधिक असते. जर योग्य उपचार केले नाही तर त्याला बरे व्हायला अनेक महिने लागतात. क्रॉनिक ब्राँकायटिस अधिक धूम्रपान करण्याने पण होतो. याने फुफ्फुसांना झालेलं नुकसान कधीच भरून येत नाही. ब्राँकायटिसपासून कसा बचाव कराल? ब्राँकायटिस होण्यापासून वाचण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. तर जाणून घेऊ पावसाळ्यात कुठल्या प्रकारच्या पदार्थांचे सेवन केलं पाहिजं- myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, आलं, लसूण, मध, निलगिरीचं तेल, सैंधव मीठ आणि हळद हे या आजारापासून वाचण्याचे घरगुती उपाय आहेत.

    • आपल्या आहारात जास्तीत जास्त धान्य आणि पॉलिअनसॅचुरेटेड फॅट (अक्रोड, बदाम, ट्युना आणि साल्मन मासे ) असणाऱ्या खाद्य पदार्थांचे सेवन केलं पाहिजे.
    • सुकामेवा अधिक खावा, त्यात बदाम, अक्रोड जास्त खावं.
    • पावसाळ्यात काढा, ग्रीन टी आणि भाज्यांचे सूप घेत राहावं.
    • संसर्गापासून वाचण्यासाठी अँटी-ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात घ्यावं. त्यासाठी हळद, आलं, लसूण या सर्वांचा आपल्या आहारात समावेश करावा.
    • तेल आणि चरबीयुक्त खाण्यापासून तसंच बाहेरचं खाणं टाळावं.
    • पावसाळ्यात कच्चा भाजीपाला किंवा कोशिंबिरी खाऊ नये. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळा आणि लिंबू खावा.
    • आरोग्य तज्ज्ञांच्या मते या मोसमात मांसाहार करू नये.

    ब्राँकायटिसच्या रुग्णांनी या गोष्टींची काळजी घ्यावी ब्राँकायटिस हा आजार थोडी काळजी घेतली तर आपोआप बरा होतो. पण जर सर्दी, खोकला ताप आणि अंगदुखी अधिक काळ राहिली तर मात्र तात्काळ डॉक्टरांना दाखवावं. याशिवाय खोकल्यासोबत जर रक्त निघत असेल, खूप जास्त कफ पडत असेल आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल तर ते क्रॉनिक ब्राँकायटिसचं लक्षण असू शकतं. म्हणून डॉक्टरांशी संपर्क करून तात्काळ उपचार करून घ्यायला हवा. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख -  ब्रोंकाइटिस न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: health , monsoon
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात