लोक सहसा शारीरिक आनंदासाठी किंवा मूल होण्यासाठी लैंगिक संबंध ठेवतात. मात्र लैंगिक संबंध हा एक चांगला व्यायामदेखील आहे. यामुळे बहुतेक आजार बरे होतात. शारीरिक संबंध ठेवताना शरीरात रक्त संचरण वेगवान होते आणि यामुळे हृदयासह अनेक अवयवांचा चांगला व्यायाम होतो. काही विशिष्ट अंतरानं लैंगिक संबंध ठेवेल तर तर किडनी स्टोनची समस्याही दूर होण्यास मदत होते, असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनात दिसून आलं आहे. myupchar.com शी संबंधित एम्सच्या डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी यांनी सांगितलं, भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 12 टक्के लोक मूत्रमार्गाच्या आजाराने ग्रस्त आहेत, त्यातील 50 टक्के रुग्णांना मूत्रपिंडाचं नुकसान होतं. दरम्यान तुर्कीमध्ये झालेल्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की, आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा शारीरिक संबंध झाल्यास किडनी स्टोन आपोआप बाहेर पडतात. आता भारतीय तज्ज्ञांनीही याला दुजोरा दिला आहे. 75 सहभागींवर हे संशोधन केलं गेलं तुर्कीमधील अंकारा प्रशिक्षण आणि संशोधन रुग्णालयात काम करणाऱ्या क्लिनिकच्या संशोधकांनी त्यांच्या अभ्यासादरम्यान 75 सहभागींचा समावेश केला आणि त्यांची तीन भागांमध्ये विभागणी करून चाचणी करून माहिती गोळा केली गेली. संशोधनात असा दावा केला गेला आहे की 5 मिमीपेक्षा कमी स्टोन असणाऱ्या 83% व्यक्तींचे किडनी स्टोन नियमित सेक्समुळे आपोआप बाहेर पडले. लैंगिक संबंधांच्या दरम्यान शरीरात नायट्रस ऑक्साईड तयार होतं तज्ज्ञांच्या मते, संभोगाच्या वेळी शरीरात नायट्रस ऑक्साईड उत्सर्जित होतं आणि उत्तेजनाच्या स्थितीत ते मूत्र नलिकेमधून बाहेर पडतं. जेव्हा नायट्रस ऑक्साईड शरीरातून बाहेर पडतं तेव्हा संभोगादरम्यान एक अतिशय आनंददायक भावना देते. जेव्हा लैंगिक संबंधात नायट्रस ऑक्साईड उत्सर्जित होतो तेव्हा मूत्र नलिकाच्या स्नायूंना बराच आराम मिळतो, तसंच या मूत्रपिंडाच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या रुग्णालासुद्धा बरं वाटतं. दरम्यान याबाबत अधिक प्रयोग आणि चाचण्या होणं आवश्यक असल्याचंही डॉक्टर म्हणाले आहेत. काही प्रकरणांमध्ये याचा नकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, “किडनी स्टोनची समस्या असल्यास अनेक घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार आहेत, जे वापरता येऊ शकतात” अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - लैंगिक आरोग्य न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.