मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Green Peas: तुम्ही मटार भरपूर खाता ना? मग या गोष्टीही तुम्हाला माहीत असाव्यात

Green Peas: तुम्ही मटार भरपूर खाता ना? मग या गोष्टीही तुम्हाला माहीत असाव्यात

प्रमाणापेक्षा जास्त मटार खाल्ला तर शरीरातलं कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं आणि युरिक ॲसिड वाढू लागतं. युरिक ॲसिड वाढल्यानं स्नायूंमधील दुखणं वाढतं. जास्त मटार खाल्ले तर हाडं कमकुवत होतात.

प्रमाणापेक्षा जास्त मटार खाल्ला तर शरीरातलं कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं आणि युरिक ॲसिड वाढू लागतं. युरिक ॲसिड वाढल्यानं स्नायूंमधील दुखणं वाढतं. जास्त मटार खाल्ले तर हाडं कमकुवत होतात.

प्रमाणापेक्षा जास्त मटार खाल्ला तर शरीरातलं कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं आणि युरिक ॲसिड वाढू लागतं. युरिक ॲसिड वाढल्यानं स्नायूंमधील दुखणं वाढतं. जास्त मटार खाल्ले तर हाडं कमकुवत होतात.

    मुंबई, 04 डिसेंबर : हिवाळा (Winter) म्हणजे मस्त हवा आणि भरपूर भाज्यांची रेलचेल. थंडीच्या दिवसांत बाजारात सगळीकडे हिरव्या पालेभाज्या, (Green Leafy Vegetables) गुलाबी गाजरं (Carrots) तर दिसतातच; पण त्याचबरोबर मस्त हिरवा आणि गोड मटारही (Green Peas) दिसू लागतो. हा ताजा मटार अनेकांच्या खास आवडीचा असतो. त्यामुळे अनेक गृहिणी मटारचे विविध पदार्थ हिवाळ्यात करतातच. काहींना तर हा मटार प्रचंड आवडतो; पण कोणतीही गोष्ट मर्यादेतच खाणं चांगलं असतं. मटारचंही तसंच आहे. छान दिसतो आणि चव चांगली आहे म्हणून जर मटार जास्त खाल्ला तर त्याचे साइड इफेक्ट्स शरीरावर होऊ शकतात. याबद्दलची माहिती ‘आज तक’ने दिली आहे.

    खरं तर मटार हा प्रोटीनचा सर्वांत चांगला स्रोत आहे. त्यामध्ये फायबर्स, (Fiber), अँटीऑक्सिडंट्स (Antiocident) आणि अन्य पोषणतत्त्वं भरपूर असतात. मटारमध्ये A,B,C आणि D व्हिटॅमिन्सही (Vitamins) असतात. मटार प्रमाणात खाल्ल्यानं ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतं.

    हिरव्या मटारमध्ये प्रोटीन, अमिनो ॲसिड्स आणि भरपूर फायबर्स असतात. त्यातल्या D व्हिटॅमिनमुळे हाडांना बळकटी मिळते. प्रमाणापेक्षा जास्त मटार खाल्ला तर शरीरातलं कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं आणि युरिक ॲसिड वाढू लागतं. युरिक ॲसिड वाढल्यानं स्नायूंमधील दुखणं वाढतं. जास्त मटार खाल्ले तर हाडं कमकुवत होतात.

    हिरव्या मटारमध्ये फायटिक ॲसिड आणि लेक्टिन असतं. हे दोन्ही घटक पोषणमूल्यं तयार होऊ देण्यात अडथळे आणतात. तसंच पचनाची समस्याही निर्माण करतात. यामध्ये असलेला फायॉस हा घटक शरीरात झिंक, मॅग्नेशियम आणि लोहासारख्या खनिजांचं प्रमाण कमी करतो. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या पोषणमूल्यांची कमतरता निर्माण होते. त्याचा थेट परिणाम रोगप्रतिकारशक्तीवर पडतो आणि शरीरात संसर्ग होण्याचा म्हणजेच बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो. म्हणूनच प्रमाणापेक्षा जास्त मटार खाऊ नये.

    मटारमध्ये असलेल्या K व्हिटॅमिनमुळे शरीरात कॅन्सर पेशींची वाढ होत नाही. यातली पोषकतत्त्वं हाडांना मजबूत बनवतात; पण हिरवा मटार प्रमाणापेक्षा जास्त खाल्ला तर शरीरात व्हिटॅमिन K चं प्रमाण वाढतं. शरीरात व्हिटॅमिन K चं प्रमाण वाढलं तर रक्त पातळ होतं आणि प्लेटलेट्सही कमी होतात. त्यामुळे एखादी जखम झाली तर ती भरून निघायला वेळ लागतो. ज्यांना पोटाच्या काही तक्रारी आहेत त्यांनी तर मटार जास्त न खाणंच चांगलं. थ्रोम्बोफ्लिबिटिस आणि संधिवातांच्या रुग्णांनाही मटार कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.

    हे वाचा - Health news: भाजलेले हरभरे खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे, वजन कमी करण्यासह पुरुषांचा वाढतो स्टॅमिना

    मटार जास्त खाल्ल्यामुळे वजनही वाढू शकतं. मटार प्रोटीनचा सर्वांत चांगला स्रोत आहेच पण जास्त प्रमाणात मटार खाल्ला तर बॉडी फॅट वाढतं. मटारमध्ये खूप फायबर्सही असतात. त्यामुळे मर्यादित प्रमाणात मटार खाल्ला, तर वजन नियंत्रणात राहतं. जास्त प्रमाण झालं तर बरोबर याच्या उलट होऊ शकतं. त्यामुळेच आरोग्यविषयक तज्ज्ञ मटार कमी प्रमाणातच खाण्याचा सल्ला देतात.

    काही अभ्यासानुसार मटार जास्त खाल्ला तर पोटाच्या आतमध्ये सूज येते आणि पोटात गॅसही तयार होतो. मटारमध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. मटार जास्त खाल्ला तर पोटाच्या तक्रारी वाढतात. मटारमध्ये असलेली साखर सहज आणि लवकर पचत नाही. त्यामुळे पोटात गॅस तयार होतो. मटारमधल्या लेक्टिनमुळे पोटात सूज येते आणि त्याच्याशी संबंधित तक्रारी वाढतात.

    हे वाचा - Health Tips: तुम्हाला माहीत आहे का? या गोष्टी शिजवून खाणं आरोग्यासाठी असतं अपायकारक

    मटारसोबत ब्राउन राइस खाल्ला तर जरा त्रास कमी होतो; मात्र ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी तर डबाबंद हिरवा मटार अजिबात खाऊ नये, असा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे आतड्याशी संबंधित विकार आणि डायरियाचाही धोका वाढतो.

    थंडीच्या दिवसांत हिरव्यागार मटारचे ढीग दिसले तर मटार नक्की घ्या. त्याचे वेगवेगळे पदार्थही करा; पण ते प्रमाणातच खाणं चांगलं.

    (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

    First published:
    top videos

      Tags: Health, Health Tips