Home /News /lifestyle /

Food Combination: सावधान! दह्यासोबत या गोष्टी खाणं आजच थांबवा; अनेक आजार लागतील मागे

Food Combination: सावधान! दह्यासोबत या गोष्टी खाणं आजच थांबवा; अनेक आजार लागतील मागे

to eat and what not with curd : आहार घेताना चुकीचे कॉम्बिनेशन झाले की, त्रास होऊ लागतो. याविषयी अनेकांना माहिती नसते आणि मग त्रास नेमका कशामुळे होऊ लागतो हे समजत नाही. काही पदार्थ दह्यासोबत खाल्ल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 12 जानेवारी : आपल्यापैकी जवळपास प्रत्येकजण दही (Curd) खातो. दही खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दहीदेखील दुधासारखा पूर्ण आहार मानला जातो. काही लोक दुधापेक्षा दह्याला श्रेष्ठ मानतात. दह्यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे तसेच प्रथिने आणि चरबी असते. त्यामुळे दही खाणे शरीरासाठी विविधदृष्या फायदेशीर आहे. पण, कधी कधी फायदेशीर असलेल्या गोष्टीही आरोग्याला हानी पोहोचवतात. कारण, त्या वस्तू ज्या पदार्थांसोबत खाल्ल्या जातात ते चुकीचे कॉम्बिनेशन (Food Combination) असू शकते. त्यामुळे मग त्रास होऊ लागतो. आहार घेताना चुकीचे कॉम्बिनेशन झाले की, त्रास होऊ लागतो. याविषयी अनेकांना माहिती नसते आणि मग त्रास नेमका कशामुळे होऊ लागतो हे समजत नाही. काही पदार्थ दह्यासोबत खाल्ल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. अशा पदार्थांविषयी जाणून घेऊया, जे दह्यासोबत कधीही (What to eat and what not with curd) खाऊ नयेत. दही आणि कांदा दही आणि कांदा एकत्र खाल्ल्याने अॅलर्जी आणि गॅस, अॅसिडिटी आणि अगदी उलट्याही होऊ शकतात. याचे कारण म्हणजे दह्याचा प्रभाव थंड असतो तर कांद्याचा प्रभाव गरम असतो. त्यामुळे या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. मात्र, विशेषतः उन्हाळ्यात आपल्यापैकी अनेकजण नकळतपणे दही आणि कांदा एकत्र सेवन करतात. परंतु, ही सवय आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. म्हणूनच दह्यासोबत कांदा खाऊ नये. दही आणि मासे दही आणि मासे एकत्र खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे गॅस आणि अॅसिडिटी तसेच अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दही खात असताना त्यासोबत मासे खाणे टाळा. कारण या दोन्ही गोष्टी फायदेशीर असूनही एकत्र खाल्ल्यास आरोग्यासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्वचेचे विकारही होऊ शकतात. दही आणि आंबा दह्यासोबत आंब्याची चवही पूर्णत: उलटी होते. आंब्याचा नैसर्गिक गुणधर्म गरम असताना दही थंड असते. त्यांचे एकत्र सेवन केल्याने इतर समस्यांशिवाय त्वचेशी संबंधित समस्याही होऊ शकतात. त्यामुळे दह्यासोबत आंब्याचे सेवन कधीही करू नये. हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात उडीद डाळ आणि दही उडदाचे गुणधर्म गरम असतात. त्यामुळे त्यासोबत दह्याचे सेवन केल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. ज्यामध्ये गॅस आणि अ‍ॅसिडिटी व्यतिरिक्त ब्लोटिंग आणि लूज मोशनची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे उडीद डाळीसोबत कधीही दह्याचे सेवन करू नये. हे वाचा - Vastu Tips: घरात वारंवार पैशांची चणचण भासते का? वास्तुदोषाचे हे असेल कारण, जाणून घ्या उपाय दही आणि दूध दही दुधापासून बनते हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण त्यांचे एकत्र सेवन केल्याने आपल्या पचनसंस्थेवर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे अॅसिडिटी आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. दही आणि दूध एकत्र घेतल्यास उलट्या होतात. त्यामुळे दह्यासोबत दूध टाळावे. दही हे नक्कीच पौष्टिक अन्न आहे. पण यासोबत काही गोष्टींचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे हे दुष्परिणाम टाळण्यासाठी दह्यासोबत या गोष्टी कधीही खाऊ नयेत. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या