मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Liver Detox is Good or Harmful: काय असतं लिवर डिटॉक्स म्हणजे? कसा होतो फायदा

Liver Detox is Good or Harmful: काय असतं लिवर डिटॉक्स म्हणजे? कसा होतो फायदा

Liver Detox is Good or Harmful : लिव्हर डिटॉक्स, क्लीन्स (Cleanse) आणि फ्लश ही एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचा, वजन कमी करण्याचा किंवा तुमचे आरोग्य सुधारण्याचा दावा (Liver Detox is Good or Harmful ) केला जातो.

Liver Detox is Good or Harmful : लिव्हर डिटॉक्स, क्लीन्स (Cleanse) आणि फ्लश ही एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचा, वजन कमी करण्याचा किंवा तुमचे आरोग्य सुधारण्याचा दावा (Liver Detox is Good or Harmful ) केला जातो.

Liver Detox is Good or Harmful : लिव्हर डिटॉक्स, क्लीन्स (Cleanse) आणि फ्लश ही एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचा, वजन कमी करण्याचा किंवा तुमचे आरोग्य सुधारण्याचा दावा (Liver Detox is Good or Harmful ) केला जातो.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत जर तुम्ही तुमच्या शरीराला थोडा वेळ दिला तर आपण अनेक आजार टाळू शकतो. महामारीच्या काळात लोक त्यांच्या आरोग्याबाबत अधिक सावध झाले आहेत. आज आपण आपलं शरीर सक्रिय आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी जे काही शक्य ते सर्वकाही करू इच्छितो. यापैकी आज आम्ही तुम्हाला Liver Detox बद्दल सांगणार आहोत.

लिव्हर डिटॉक्स, क्लीन्स (Cleanse) आणि फ्लश ही एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचा, वजन कमी करण्याचा किंवा तुमचे आरोग्य सुधारण्याचा दावा (Liver Detox is Good or Harmful ) केला जातो. पण अमेरिकन वेबसाइट वेबएमडीचा अहवाल या दाव्याविषयी काही वेगळंच सांगतो. या अहवालानुसार, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला यकृत डिटॉक्सची करायचं आहे, तर याच्यामुळं फारसे काही होणार नाही, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे.

यकृत हे शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. हे शरीरातील खराब घटक काढून टाकण्यास मदत करतं आणि अनेक पोषक द्रव्य आणि औषधी गुणधर्मांसाठीही कार्य करतं. बर्‍याच लोकांना असं वाटतं की भरपूर प्रमाणात दारू प्यायल्यानंतर किंवा आरोग्यास अपायकारक अन्न खाल्ल्यानंतर डिटॉक्स केल्यानं त्यांच्या यकृताला विष काढून टाकण्यास मदत होते. तसंच, यकृताला दररोज चांगले कार्य करण्यास याची मदत होईल, असंही अनेकांना वाटतं. तर, याच्यामुळं यकृत रोगाच्या उपचारातही मदत मिळेल, असा अनेकांना विश्वास आहे.

बर्‍याच डिटॉक्स प्रक्रियांप्रमाणे, यकृत शुद्धीकरणाचे विशिष्ट टप्पे असतात. यामध्ये तुम्हाला अनेक दिवस उपवास करण्यास सांगितलं जाऊ शकतं किंवा फक्त रस किंवा इतर द्रव पिण्यास सांगितलं जाऊ शकतं. तुम्हाला विहित आहाराचं पालन करावं लागेल किंवा हर्बल किंवा पूरक आहार घ्यावा लागेल. डिटॉक्स करून देणारे तुम्हाला विविध उत्पादनं खरेदी करण्याचा सल्ला देतात.

हे वाचा - क्रिप्टो वॉलेट संबंधित Google Ads वर क्लिक नका करु, होऊ शकतं नुकसान; वाचा संपूर्ण प्रकरण

यकृत डिटॉक्स सुरक्षित आहे का?

डिटॉक्सबद्दल इतकी माहिती घेतल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न येईल की लिव्हर डिटॉक्स सुरक्षित आहे का? तर यकृताच्या आजारांवर वैद्यकीय उपचार आहेत, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. परंतु, अद्यापपर्यंत असा कोणताही पुरावा सापडला नाही की डिटॉक्स प्रोग्राम किंवा सप्लिमेंट्स यकृताचं नुकसान दुरुस्त करू शकतात. शिवाय, डिटॉक्समुळे यकृताला नुकसान होऊ शकतं, ही बाब सत्य आहे. अनेक अभ्यासांतून असं दिसून आलंय की, हर्बल आणि ठराविक पूरक आहार यकृताला दुखापत होण्याचा धोका वाढवत आहेत. उदाहरणार्थ, ग्रीन टीचा अर्क हिपॅटायटीसमुळे अशा प्रकारचं नुकसान होऊ शकतं. कॉफी एनीमामध्ये (coffee enemas) समाविष्ट असलेल्या काही आहारांमुळे संक्रमण आणि इलेक्ट्रोलाइट (electrolyte) समस्या उद्भवू शकतात, ज्या घातक असू शकतात.

डिटॉक्स प्रोग्राम आणि उत्पादनांबद्दल जाणून या बाबी जाणून घेणं आहे आवश्यक

- काही कंपन्या हानीकारक असणारी सामग्री वापरतात. असेही काही जण आहेत, ज्यांनी गंभीर आजारांवर किती चांगले उपचार केले, याबद्दल खोटे दावे केले आहेत.

- अनपाश्चराइज्ड ज्यूसमुळं (Unpasteurized juices) तुम्ही आजारी पडू शकता. विशेषतः जर तुमचं वय जास्त असेल किंवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल, तर जास्त प्रमाणात हानी होऊ शकते.

- जर तुम्हाला मूत्रपिंडाचा आजार (kidney disease) असेल, तर क्लिन्समुळं तुमचा आजार आणखी वाढू शकतो.

- तुम्हाला मधुमेह असल्यास, तुम्ही सामान्यतः खाण्याच्या पद्धतीत बदल करणारा आहार सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हे वाचा - सणकी विकृत! Google वर सर्च केले खुनाचे प्रकार, मोबाईल पाहून पोलिसही चक्रावले

- तुम्ही डिटॉक्स प्रोग्रामचा भाग म्हणून उपाशी राहिल्यास, तुम्हाला अशक्तपणा वाटू शकतो किंवा तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते. तसंच, डोकेदुखीचा किंवा चक्कर येण्याचा त्रासही होऊ शकतो.

- जर तुम्हाला हिपॅटायटीस बी असेल, ज्यानं यकृत खराब झालं असेल तर, उपाशी राहिल्यानं त्रास वाढू शकतो.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle