• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • How to remove wrinkles: चेहऱ्यावरील सुरकुत्या वाढतायत; वय दिसायला लागण्यापूर्वीच करा हे उपाय

How to remove wrinkles: चेहऱ्यावरील सुरकुत्या वाढतायत; वय दिसायला लागण्यापूर्वीच करा हे उपाय

अनेकांच्या त्वचेवर कमी वयातच सुरकुत्या दिसू लागतात. त्या सौंदर्यासाठी मारक ठरतात. चेहऱ्याव्यतिरिक्त, हात आणि पायांच्या त्वचेवरही सुरकुत्या दिसू शकतात. पण इथे सांगितलेल्या काही गोष्टी तुमच्या सुरकुत्या दूर (How to remove wrinkles) करतील.

 • Share this:
  नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : चेहऱ्यावर सुरकुत्या येणं हे वृद्धत्वाचं लक्षण आहे. वय वाढल्यानं त्वचा सैल होऊ लागते. मात्र, अनेकांच्या त्वचेवर कमी वयातच सुरकुत्या दिसू लागतात. त्या सौंदर्यासाठी मारक ठरतात. चेहऱ्याव्यतिरिक्त, हात आणि पायांच्या त्वचेवरही सुरकुत्या दिसू शकतात. पण इथे सांगितलेल्या काही गोष्टी तुमच्या सुरकुत्या दूर (How to remove wrinkles) करतील. तसंच, तुमची त्वचाही चमकदार होईल. चेहरा, हात आणि पायांवरच्या सुरकुत्या (Wrinkles on face, hands and feet) कशा घालवायच्या? सुरकुत्याच्या समस्येसाठी ऑलिव्ह ऑईल (Olive Oli) हात, पाय किंवा चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. हे त्वचेला पोषण देऊन निरोगी बनवण्यास मदत करतं. रात्री झोपण्यापूर्वी थोडे कोमट ऑलिव्ह ऑईल हातांवर घेऊन सुरकुतलेल्या भागावर मालिश करा. सुरकुत्यांवरील उपचारांसाठी केळी (Banana) सुरकुत्यांवर उपचार करण्यासाठी केळीचा वापर केला जाऊ शकतो. कमी प्रमाणात आलेल्या सुरकुत्या काढून टाकण्यासाठी पिकलेलं केळं कुस्करून पेस्ट बनवा. यानंतर, ते फेस पॅकप्रमाणे चेहऱ्यावर, हाता-पायांवर लावा. सुकल्यानंतर साध्या पाण्यानं धुवा. हे वाचा - आयटी क्षेत्रात वरदान ठरतंय Work From Home; कंपन्यांसह ‘या’ कर्मचाऱ्यांनाही मोठा फायदा पपई (Papaya) पोटासाठी फायदेशीर असलेली पपई त्वचेवरील सुरकुत्यांपासूनही सुटका करू शकते. पपईदेखील केळीप्रमाणेच वापरायची आहे. पपईचा एक मोठा तुकडा कुस्करून घ्या त्याची पेस्ट बनवा. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी त्याचा फेस पॅक लावा. पाय आणि हातांवर 5 मिनिटे मालिश करा. कोरडे झाल्यानंतर पाण्यानं धुवा. लिंबू आणि मध (Lemon and Honey) हे वाचा - Mumbai Job Alert: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई इथे 85,000 रुपये पगाराची नोकरी; ‘या’ पदांसाठी जागा रिक्त सुरकुत्या दूर करण्यासाठी लिंबाचा वापर मधासोबत केला जाऊ शकतो. एक चमचा लिंबाचा रस दोन चमचे मधात मिसळून चेहऱ्यावर आणि हाता-पायांवर लावा. अगदी हलकेच मालिश करून काही वेळ तसंच ठेवा. मिश्रण सुकल्यानंतर पाण्यानं स्वच्छ करा.
  Published by:News18 Desk
  First published: