Home /News /lifestyle /

प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी सोयाबीन आहे जबरदस्त फायदेशीर; असा करा उपयोग

प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी सोयाबीन आहे जबरदस्त फायदेशीर; असा करा उपयोग

शरीराच्या विविध गरजा भागवण्याव्यतिरिक्त सोयाबीनचे सेवन अनेक रोगांच्या उपचारांमध्ये खूप प्रभावी आहे. शारीरिक वाढ, त्वचेच्या समस्या आणि केसांच्या समस्यांवरही सोयाबीन (soybeans) खाणं फायदेशीर आहे.

    नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : प्रथिनांची कमतरता पूर्ण करण्यासाठी मांसाहारी लोक अंडी, मासे आणि मांस खातात. परंतु, जे लोक शाकाहारी आहेत, त्यांना प्रथिनांनी समृद्ध शाकाहारी अन्नाची आवश्यकता असते. त्यांच्यासाठी सोयाबीन (soybeans) हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. सोयाबीनमध्ये भरपूर प्रथिने आढळतात. अंडी, दूध आणि मांसामध्ये आढळणाऱ्या प्रथिनांपेक्षा जास्त प्रथिने सोयाबीनमध्ये (Health benefits of soybeans) आहेत. शरीराच्या विविध गरजा भागवण्याव्यतिरिक्त सोयाबीनचे सेवन अनेक रोगांच्या उपचारांमध्ये खूप प्रभावी आहे. शारीरिक वाढ, त्वचेच्या समस्या आणि केसांच्या समस्यांवरही सोयाबीन (soybeans) खाणं फायदेशीर आहे. सोयाबीनमध्ये पोषक घटक आढळतात सोयाबीन हा एक महत्त्वाचा अन्न स्रोत आहे. त्याचे मुख्य घटक प्रथिने, कर्बोदके आणि चरबी आहेत. सोयाबीनमध्ये 36.5 ग्रॅम प्रथिने, 22 टक्के तेल, 21 टक्के कार्बोहायड्रेट, 12 टक्के आर्द्रता आणि 5 टक्के भस्म असते. दूध-अंडी आणि सोयाबीनमध्ये आढळणारी प्रथिने एक अंडे (100 ग्रॅम) - 13 ग्रॅम दूध (100 ग्रॅम) - 3.4 ग्रॅम मांस (100 ग्रॅम) - 26 ग्रॅम सोयाबीन (100 ग्रॅम) - 36.5 ग्रॅम रोज किती सोयाबीन खाऊ शकतो? आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, तुम्ही दररोज 100 ग्रॅम सोयाबीन खाऊ शकता. 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण सुमारे 36.5 ग्रॅम असते. दिवसातून एकदा याचा वापर केल्याने तुमच्या शरीराला खूप फायदे होतात. ज्यांना प्रोटीनची कमतरता आहे त्यांच्यासाठी हे खूप चांगले खाद्य आहे. हे वाचा - भारतात पुन्हा येणार High Paid Salary चे दिवस! होणार सरासरी 9.3% पगारवाढ; कंपन्या देणार बंपर नोकऱ्या सोयाबीन खाण्याचे आश्चर्यकारक फायदे प्रथिनेयुक्त सोयाबीनचे सेवन चयापचय प्रणाली निरोगी ठेवते. सोयाबीनचे सेवन पेशींची वाढ आणि खराब झालेल्या पेशींची झीझ भरून करण्यास मदत करते. सोयाबीनमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स अनेक प्रकारचे कर्करोग रोखण्यास मदत करतात. सोयाबीनमध्ये आढळणारे पोषक घटक हाडे मजबूत करण्याचे काम करतात. सोयाबीनचे सेवन मानसिक संतुलन सुधारून मनाला ताजेतवाने ठेवण्याचे काम करते. सोयाबीनचे सेवन हृदयरोगासाठी देखील खूप फायदेशीर आहे. हे वाचा - चमत्कारच! डुकराच्या किडनीचे माणसाच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण, संशोधकाचं सर्वात मोठं यश सोयाबीनचे सेवन कसे करावे रात्री झोपण्यापूर्वी एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात 100 ग्रॅम सोयाबीन भिजवा. सकाळी उठल्यानंतर तुम्ही नाश्त्यासाठी याचे सेवन करू शकता. याशिवाय तुम्ही भाजी बनवूनही सोयाबीन खाऊ शकता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या