• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Vegan Tea: तुम्ही कधी प्यायलाय का व्हेगन टी? जाणून घ्या कसा बनवायचा आणि त्याचे फायदे

Vegan Tea: तुम्ही कधी प्यायलाय का व्हेगन टी? जाणून घ्या कसा बनवायचा आणि त्याचे फायदे

health benefits of Vegan Tea: सर्वसाधारणपणे, गाय, म्हैस आणि बकरी यांसारख्या प्राण्यांपासून मिळवलेल्या दुधाचा वापर चहा बनवण्यासाठी केला जातो. तर, व्हेगन टी बनवण्यासाठी प्राण्यांचं दूध वापरलं जात नाही. या चहामध्ये वनस्पती-आधारित दूध वापरलं जातं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: तंदुरुस्त राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी, सध्या शाकाहारी आहाराचा (Vegan diet) ट्रेंड खूप वेगाने वाढत आहे. तुम्ही याबद्दल अनेकदा ऐकलं आणि वाचलं असेल. कदाचित तुमच्यापैकी बरेच जण शाकाहारी आहार घेत असतील. पण तुम्ही कधी शाकाहारी चहा (Vegan Tea - व्हेगन टी) प्यायला आहे का? किंवा आपण याबद्दल वाचले किंवा ऐकले आहे? जर नसेल तर, ही माहिती तुमच्या नक्कीच कामाची आहे. कारण, शाकाहारी चहा केवळ चवीनुसारच नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही खूप (health benefits of Vegan Tea) फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला या हेल्दी आणि टेस्टी व्हेगन टीच्या फायद्यांबद्दल सांगत आहोत. यासोबतच व्हेगन टी म्हणजे काय आणि हा चहा बनवण्याची पद्धत काय आहे, हेही आपण जाणून घेऊया. व्हेगन टी म्हणजे काय? सर्वसाधारणपणे, गाय, म्हैस आणि बकरी यांसारख्या प्राण्यांपासून मिळवलेल्या दुधाचा वापर चहा बनवण्यासाठी केला जातो. तर, व्हेगन टी बनवण्यासाठी प्राण्यांचं दूध वापरलं जात नाही. या चहामध्ये वनस्पती-आधारित दूध वापरलं जातं. उदा., सोया दूध किंवा बदामाचं दूध. व्हेगन टीसाठी साहित्य 1 कप वनस्पतीजन्य दूध. उदा., बदाम दूध किंवा सोया दूध 1/4 कप पाणी 1 टीस्पून चहापत्ती चवीनुसार ब्राऊन शुगर किंवा गूळ 1/2 टीस्पून चाय मसाला 1 छोटा आल्याचा तुकडा पुदिन्याची 3 किंवा 4 पानं हे वाचा - Mental health: डिप्रेशनमध्ये जाण्याची ही असतात लक्षणं; त्यातून बाहेर काढण्यासाठी मित्र, नातेवाईकांना अशी करा मदत व्हेगन टी कसा बनवायचा? व्हेगन टी बनवण्यासाठी प्रथम एका पातेल्यात पाणी घेऊन आणि गॅस चालू करा. नंतर पाण्यात चहाची पानं, ब्राऊन शुगर किंवा गूळ घालून एक उकळी येऊ द्या. पाण्याला उकळी आल्यावर त्यात चाय मसाला घाला आणि आल्याचा तुकडाही घाला. तसंच, पुदिन्याची पानं घालून दोन मिनिटं शिजवा. आता त्यात बदामाचं दूध किंवा सोया दूध घाला आणि चमच्यानं चहा ढवळत राहा. या दरम्यान गॅसची आच मंद ठेवा आणि आणखी एक किंवा दोन मिनिटे उकळवा. व्हेगन टी तयार आहे. हे वाचा - या चुकांमुळं हिवाळ्यात वाढतो Heart Attack चा धोका, या गोष्टी टाळणंच ठरेल फायदेशीर व्हेगन टीचे फायदे या व्हेज चहामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात. तो प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शिवाय, लवकर आजारी पडण्याचा धोका कमी होतो. या चहामध्ये दुधाच्या चहापेक्षा कमी फॅट असतं. त्यामुळं कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतं. तसंच वजन कमी करण्यात आणि हृदय निरोगी ठेवण्यासही खूप मदत होते. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी व्हेगन चहा हा सामान्य चहाचा उत्तम पर्याय आहे. यासोबतच, हा चहा प्यायल्यानं अॅसिडिटी आणि छातीत जळजळ होण्याची समस्याही होत नाही. (सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: